कॅन्सरच्या पेशी मारुन टाकतात साध्या वाटणा-या या ५ भाज्या, बॉडीत बनू देत नाही जीवघेण्या गाठी, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

0

कर्करोग हा प्राणघातक आजार आहे. यावर उपचार शक्य असले तरी कॅन्सरमुळे लाखो लोक मृत्युमुखी पडतात. कॅन्सर हा 100 हून अधिक रोगांचा समूह आहे. कॅन्सरच्या गाठी या शरीरात जवळजवळ कुठेही तयार होऊ शकतात. त्यापैकी काही प्रकारचे कर्करोग तुमच्या जीवनशैलीवर परिणाम करतात. म्हणजेच तुमची दैनंदिन दिनचर्या तुम्हाला या प्राणघातक आजाराच्या कचाट्यात आणूही शकते आणि त्यापासून वाचवू सुद्धा शकते. कर्करोग म्हणजे काय? तुमच्या शरीराला वेळोवेळी पेशींची गरज असते. या पेशी देखील मूलभूत एकक किंवा महत्त्वाचा घटक आहेत, जे मानवी शरीर बनवतात. अशा स्थितीत पेशी वाढतात आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी विभाजित होतात. सहसा, जेव्हा पेशी खूप जुन्या किंवा खराब होतात तेव्हा मरतात. त्यानंतर नवीन पेशी त्यांची शरीरात बनू लागतात. परंतु या प्रक्रिये दरम्यान जर अनुवांशिक बदल झाला तर तो कर्करोगाचे रूप धारण करतो आणि शरीरात घातक गुठळ्या किंवा गाठी तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुमच्या जीवनशैलीत योग्य बदल करून आणि खाण्याच्या सवयींमध्ये सुधारणा करून तुम्ही या प्राणघातक आजारापासून दूर राहू शकता. येथे आम्ही तुम्हाला अशा काही भाज्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या या जीवघेण्या आजारापासून तुमचा बचाव करतील आणि या भाज्या बाजारात सहज उपलब्ध असतात. साध्यासुध्या व स्वस्त दिसणार्‍या या भाज्यांमध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात, ज्यामुळे त्यांचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.

अरबीची भाजी

अरबीची भाजी पॉलीफेनॉलचा चांगला स्रोत आहे. पॉलीफेनॉलमध्ये कर्करोगाचा धोका कमी करण्याची क्षमता असते. पॉलीफेनॉल कर्करोगाच्या पेशींची वाढ (cancer cells growth) थांबवण्याचे काम करतात. शिवाय ही भाजी ट्यूमरिजेनिक पेशी ज्यामुळे ट्यूमर वाढतो आणि कर्करोग होतो अशा पेशी कमी करण्यास देखील मदत करते.

टोमॅटो

टोमॅटो खाण्याचे फायदे कॅन्सरचा धोका कमी करण्यात दिसतात. लाल टोमॅटोमध्ये लाइकोपीन आढळते जे कॅरोटीनॉइड आहे. हे कंपाऊंड कर्करोगाविरूद्ध किमो प्रतिबंधक गुणधर्म दर्शविते. याव्यतिरिक्त, लाइकोपीनमध्ये अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म देखील असतात, जे कर्करोगाच्या वाढीस आळा घालण्यास आणि सुरूवातीलाच रोखण्यास मदत करतात.

पालक

पालकच्या भाजीतील गुणधर्मांमध्ये शरीरात तयार झालेल्या कॅन्सरच्या पेशींना मुळापासून उपटून टाकण्याची क्षमता असते. पालकमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते आणि हे दोन्ही पोषक घटक कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यापासून संरक्षण करण्याचे काम करतात. याशिवाय, ही भाजी अँटी-ऑक्सिडंटसारखी फ्री-रॅडिकल्स आणि कार्सिनोजेन्स म्हणजे एक पदार्थ ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो त्याला प्रतिबंधित करण्यास मदत करते.

ब्रोकोली

ब्रोकोली कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ब्रोकोलीमध्ये कमी प्रमाणात सेलेनियम असते ज्यामध्ये अँटी-कॅन्सर गुणधर्म असतात. याव्यतिरिक्त, त्यात ग्लुकोराफॅनिन हा पदार्थ असतो, जो अँटीकॅन्सर पदार्थ सल्फोराफेनमध्ये बदलू शकतो. अशा परिस्थितीत, ब्रेस्ट कॅन्सर, स्किन कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग अशा अनेक प्रकारच्या कर्करोगापासून बचाव आणि उपचारांमध्ये ही भाजी प्रभावी मानली जाऊ शकते.

दूधी

दूधी कर्करोगाच्या आजाराशी लढण्यासाठी गुणकारी आहे. वास्तविक, दुधीच्या भाजीमध्ये केमोप्रीव्हेंटिव्ह प्रभाव असतो, जो कॅन्सरला दूर ठेवण्याचे काम करतो. दुधीच्या रसाचा वापर त्वचेचा कर्करोग होऊ न देण्यासाठी देखील काम करू शकतो.

लाईफस्टाइलमुळे होणारे कॅन्सर

मुत्राशयाचा कर्करोग (bladder cancer)
स्तनाचा कर्करोग (breast cancer)
गर्भाशयाच्या मुखाचा किंवा तोंडाचा कर्करोग (cervical cancer)
आतड्यांचा कर्करोग (colon cancer)
किडनीचा कर्करोग (kidney cancer)
फुफ्फुसाचा कर्करोग (lungs cancer)
गर्भाशय किंवा अंडाशयाचा कर्करोग (ovarian cancer)
स्वादुपिंडाचा कर्करोग (pancreatic cancer)
पुरुषांमधील प्रोस्टेट कर्करोग (prostate cancer)
त्वचेचा कर्करोग (skin cancer)
पोटाचा कर्करोग (stomach cancer)

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top