मोदी-शाहांनी गडकरींना संसदीय मंडळातून का काढलं, नक्की काय घडलं? काँग्रेसने सांगितलं कारण

0


भाजपमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानला जाणाऱ्या संसदीय समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात नितीन गडकरी यांच्याकडे असलेल्या प्रत्येक खात्याची कामगिरी उजवी राहिली आहे. तरीही नितीन गडकरी यांना संसदीय समितीमध्ये स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या. यामागे भाजपमधील अंतर्गत खदखद कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. नितीन गडकरी हे अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्याविरोधात भूमिका घेताना दिसून आले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी नितीन गडकरी यांना संसदीय मंडळातून बाहेर काढल्याचा आरोप काँग्रेस पक्षाकडून करण्यात आला.
काँग्रेस पक्षाकडून चक्क नितीन गडकरी यांच्यावरील अन्यायाविरोधात ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमधून अनेक सवाल उपस्थित करण्यात आले आहेत. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील टॉप परफॉर्मर नेत्यांपैकी एक होते. तरीही त्यांना संसदीय समितीमधून बाहेर करण्यात आले. जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिस्पर्धी असेल, त्याला अशाचप्रकारे बाहेरचा रस्ता दाखवला जातो. नितीन गडकरी यांच्यासोबत हेच घडले, असे नमूद करत काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडिओत नितीन गडकरी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील वादावर भाष्य करण्यात आले आहे. नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात मला राजकारण सोडावेसे वाटत असल्याचे म्हटले होते. महात्मा गांधी यांच्या काळातील राजकारण आणि आजच्या राजकारणात खूप मोठा फरक आहे. त्यावेळी विकास आणि समाजकारणासाठी राजकारण होत असे. पण आज केवळ सत्तेसाठी राजकारण केले जात आहे. ही चिंतेची गोष्ट आहे, असे नितीन गडकरी यांनी म्हटले होते.

नितीन गडकरींऐवजी भाजपचा नवा चेहरा देवेंद्र फडणवीस
भाजपकडून आता नितीन गडकरी यांच्याऐवजी पक्षाचा महाराष्ट्रातील चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे दिसत आहे. कारण गडकरी यांना संसदीय समितीमधून काढत असतानाच मोदी आणि शाहांनी देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे आगामी काळात देवेंद्र फडणवीस केंद्रीय राजकारणात सक्रिय होतील, असे सांगितले जाते. त्याची पूर्वतयारी म्हणून त्यांना केंद्रीय निवडणूक समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक प्रशासक आणि स्टार प्रचारक अशा दोन्ही भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. याउलट आता निवडणुका जिंकण्याच्यादृष्टीने गडकरी यांची उपयुक्तता आता फारशी नाही, असा भाजपनेतृत्त्वाचा विचार असल्याची चर्चा आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top