सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस कडून गुजरात मधील बिलकिस बानो प्रकरणातील ११ आरोपींना परत गजा आड करण्यासाठीच्या मागणीसाठी निदर्शने व धरणे आंदोलन

0


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 


गुजरात सरकारने बिलकिस बानो बलात्कार प्रकरणातील सर्व ११ आरोपींची नुकतीच ऑगस्ट महिन्यात जी सुटका करण्यात आलेली आहे त्यांना पुन्हा परत अटक करून गजाआड करण्यात यावे या मागणीसाठी सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवार दिनांक २७ रोजी स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. गुजरात मध्ये २००२ मध्ये बिलकिस बानो या महिलेवर ११ जणांनी सामूहिक बलात्कार करून तिच्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा खून करून अवघे कुटुंब संपवले होते. बिल्कीस बानो यांनी हिंमत न हारता प्रदीर्घ न्यायालयीन लढा उभारून मुंबईमध्ये विशेष सी.बी.आय. न्यायालय ,मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत सर्व ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा होईपर्यंत हिम्मत ठेवली होती. त्यानंतर बिलकिस बानोला न्याय मिळाला असे वाटले होते ,नुकतीच गुजरात सरकारने सदरहू प्रकरणातील सर्व ११ आरोपींची सुटका केली आहे .यासंदर्भात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व यात लक्ष घालण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्टेशन चौकातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने व धरणे धरून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता मैत्री, महापौर दिग्विजय सूर्यवंशी ,सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता जाधव ,सांगली अध्यक्षा अनिता पांगम, मिरज अध्यक्षा वंदना चंदनशिवे ,कुपवाड अध्यक्षा वैशाली कळके, शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती अदाटे, छाया जाधव ,वाळवा तालुका अध्यक्षा सुनीता देशमाने ,पलूस तालुका अध्यक्षा नंदाताई पाटील, हरिदास पाटील ,समीर कुपवाडे, संजय तोडकर ,आयुब बालगीर, डॉक्टर शुभम जाधव ,उमर गवंडी, उत्तम कांबळे ,अर्जुन कांबळे, युसुफ जमादार, वैशाली मोहिते, चंपाताई जाधव, लता माने, उषा गायकवाड, प्रियांका तुपलोंढे, रूपाली कारंडे, प्रियांका बिचारे, छाया पांढरे, स्वाती शिरूर ,सुनिता जगधने, विद्या कांबळे, महालिंग हेगडे ,विनायक हेगडे, मुन्ना शेख ,जुनेद जमादार, कुमार वायदंडे ,रामभाऊ पाटील, सरफराज शेख ,आशुतोष धोत्रे, अक्षय शेंडगे यांचे सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top