दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी १३०० हून अधिक जागा रिक्त, ८१ हजारपर्यंत मिळेल पगार

0
बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये दहावी, बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना १९ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

हावी, बारावी उत्तीर्ण असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची संधी चालून आली आहे. डायरेक्टरेट जनरल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये हेड कॉन्स्टेबल (BSF Head Constable 2022) ची पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३१२ पदे भरली जाणार आहे. याअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) ची ९८२ पदे आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक)ची ३३० पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) दोन वर्ष, रेडिओ आणि टेलिव्हिजन, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट किंवा डेटा तयार करणे आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, जनरल इलेक्ट्रॉनिक्स किंवा डेटा एंट्री ऑपरेटरचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावी. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार ५०० ते ८१ हजार १०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२० ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरु असून १९ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार बीएसएफच्या अधिकृत वेबसाइट bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. उमेदवारांना https://bsf.gov.in/home.html या लिंकवर क्लिक करून थेट अर्ज करू शकतात. तसेच, या लिंकद्वारे बीएसएफ हेड कॉन्स्टेबल भरती नोटिफिकेशन तपासता आणि डाऊनलोड करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top