महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वारणा उद्योग समूहास भेट व पाहणी

0

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका) : महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वारणा उद्योग समूहास भेट देऊन पाहणी केली. आमदार डॉ. विनय कोरे यांनी त्यांचे वारणा उद्योग समूहाच्या वतीने स्वागत केले.

  यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेडगे, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी पी.पी. मोहोड, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

  श्री. विखे पाटील यांनी वारणा उद्योग समूहातील प्रोसेस विभाग, पॅकिंग विभाग, मेकिंग विभाग आणि माल्टेड फूड डिव्हीजन या विभागाना भेट देऊन माहिती घेतली आणि सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या परिश्रमातून उभा राहिलेल्या या उद्योग समूहास त्यांनी शुभेच्छा दिल्या.


  तत्पूर्वी महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.


This news is co provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top