कोडोली ता. पन्हाळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम संपन्न...

0

 

जनप्रतिसाद न्युज नेटवर्क :- शासकीय योजनाच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही - आमदार डॉ. विनय कोरे (सावकर)

प्रत्येक योजनांचा लाभ वंचित व गरजूंना मिळावा यासाठी शासन प्रयत्न करीत असते. बऱ्याच सोयी, सवलती व योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचावे यासाठी शासन आपल्या दारी हा अभिनव उपक्रम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त कोडोली येथील हौसिंग सोसायटी हॉलमध्ये संपन्न झाला.दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप, कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत धनादेश वाटप, आयुष्यमान प्रधानमंत्री योजनेचे कार्ड, आरोग्य विभागाचे गोल्डन कार्ड आणि अन्य विविध योजनेचे प्रमाणपत्र आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

जनतेच्या विकासासाठी शासनासह प्रशासन आपल्या दारी आले आहे. सरकार प्रभावीपणे शासकीय याेजना राबवित आहे. असे असले तरी जनजागृतीअभावी काही नागरिक याेजनांच्या लाभापासून वंचित आहेत. अशा नागरिकांचा शाेध घेऊन प्रशासनाने त्यांना याेजनाचा लाभ द्यावा, जेणेकरून शेवटच्या घटकाचाही विकास हाेईल, असे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी यावेळी सांगितले.


यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बी. टी. सांळोखे, माजी जिल्हा परिषद सदस्य विशांत महापुरे, कोडोली गावच्या सरपंच गायत्री रणजित पाटील, उपसरपंच माणिक मोरे, माजी सरपंच शंकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रशांत जमने, नितीन कापरे, निखील पाटील, प्रविण जाधव, प्रकाश पाटील, प्रकाश हराळे, अविनाश महापुरे, कार्यक्रमाचे आयोजक दिपक सकटे, विकास चोपडे, सर्व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top