फिरते लोक न्यायालयात निवाडयासाठी व कायदेशीर मार्गदर्शनात्मक सल्यासाठी जाहिर आवाहन - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश अजेय राजंदेकर

0

 

जनप्रतिसाद न्युज नेटवर्क : (अनिल जोशी ) सांगली जिल्हयाच्या परिसरातील विविध न्यायालयात दाखल असलेल्या आपआपसातील न्यायालयीन प्रकणातील वाद सामोपचाराने व समझोत्याने कायदेशीर मार्गाने जलद गतीने फिरत्या न्यायालया मार्फत सोडवण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी दि.८ ऑगस्ट 2022 ते ८ सप्टेंबर 2022 अखेर पर्यंत शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्यातील विविध न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणातील संबंधीत सर्व पक्षकारांनी याची नोंद घेऊन आपआपसातील न्यायालयीन प्रकरणातील वाद सामोपचाराने व समझोत्याने कायदेशीर रित्या सोडवण्यासाठी सदर फिरते लोकन्यायालयाच्या "आपल्यादारी न्याय " या महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणाच्या योजने अंतर्गत असलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजय राजंदेकर यांनी केले आहे. सांगली जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जाणा-या या फिरत्या लोकन्यायालयाच्या मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर यांच्या हस्ते दाखवून व्हॅन मार्गस्थ करण्यात आली. यावेळी जिल्हा विधीप्राधिकरणाचे सचिव प्रदीप नरडेले यांची मार्गदर्शनपर उपस्थिती लाभली. सदर झालेल्या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेकर फिरत्या लोक न्यायालयाचे पॅनेल प्रमुख एस. ए. उपाध्ये यांचेसह जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबाधे, पी.बी.जाधव, आर. एन. मानगांवकर , एस.पी.पोळ, आर. एस. भद्‌गले, मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर, वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, जिल्हा न्यायालय प्रबंधक व्ही. व्ही. कुलकर्णी व समस्त न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

This news is co-provided by Janpratisadnews




Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top