सांगली संस्थानच्या चोर गणपतीचे आगमन व प्राणप्रतिष्ठापना

0


 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 
 *(अनिल जोशी)* 

सांगली संस्थानच्या गेली २०० वर्षाच्या परंपरेचा  व श्री गणपती पंचायतनाचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या चोर गणपतीचे आगमन व  विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठापना झाली आहे . प्रथम सांगली संस्थानचे राजे श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी चोर गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून परंपरा चालू केली . भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला चोर गणपतीचे विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना केली जाते . सर्वसाधारणपणे बऱ्याच सांगलीकरांना चोर गणपती केव्हा आला व केव्हा गेला याची कल्पना नसते . श्री चोर गणपतीच्या मूर्तीची विधीपूर्वक भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला पहाटे पाच वाजता साधेपणाने प्रतिष्ठापना केली जाते . भाद्रपद शुद्ध चतुर्थी अगोदर त्याला साधेपणाने निरोप दिला जातो . श्री चोर गणपतीच्या प्रतिष्ठापने नंतरच संस्थानच्या दरबार हॉलमध्ये श्री गणेशोत्सवास सुरुवात होते. संस्थानच्या चोर गणपतीला परंपरेनुसार महापूजा, प्रसाद ,नैवेद्य वगैरे षोडशोपचारे पूजा करून नंतरच  शुद्ध चतुर्थी अगोदर त्याला गुपचूप पणे निरोप देण्यात येतो .चोर गणपतीची मूर्ती ही सुमारे २०० वर्षांपूर्वीची असून पर्यावरण पूर्वक कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली आहे. ही मूर्ती अतिशय रेखीव, सुबक व नयन मनोहर आहे. फक्त दरवर्षी त्या मूर्तीला रीतीरीवाजाप्रमाणे रंग दिला जातो. आज पासून म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेपासून संस्थांच्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा विचार हा २०० वर्षांपूर्वीसुद्धा अस्तित्वात होता हे या चोर गणपतीच्या मूर्ती कामावरून सिद्ध होते . श्रींच्या गणेशोत्सवानंतर या चोर गणपतीची मूर्ती सुरक्षित ठिकाणी ठेवली जाते. काल म्हणजे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला संस्थांच्या शाही गणेशोत्सवास सुरुवात झाली आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top