सांगलीत सांगली शिक्षण संस्थेच्या डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिरातील बालगोपाल विद्यार्थ्यांची उत्साहवर्धक शानदार श्री गणेशोत्सव मिरवणूक...

0

 जनप्रतिसात न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी) 

सांगलीतील नामवंत व नावाजलेल्या सांगली शिक्षण संस्थेच्या डॉ. बापट बाल शिक्षण मंदिरातील पहिली ते चौथी बालगोपाल विद्यार्थ्यांची मिरवणूक अतिशय उत्साहात सुरू होऊन, श्रींच्या मूर्तीची शाळेच्या भव्य वास्तूमध्ये सुंदर आरास केलेल्या व दर्शनी असलेल्या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली. शाळेतील बालगोपाल विद्यार्थ्यांनी  एकच गर्दी केली होती. श्रींच्या मिरवणुकीत सुरुवातीस शाळेच्या बालगोपाल विद्यार्थ्यांचे झांज पथक, ढोल ,ताशा  अशा वाद्यांचा गजर करणारे पथक होते. त्यानंतर पारंपारिक वेशभूषा मध्ये असलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी पारंपारिक इतिहासातील भूमिकेच्या शानदार वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थिनींनी सुद्धा पारंपारिक नऊवारी साड्या परिधान करून सुंदर साज शृंगार केला होता. 


श्रींची मूर्ती एका सुंदर नटवलेल्या व आरास केलेल्या पालखीत विराजमान झाली होती . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक यांची उपस्थितीअवर्णनीय होती. या मिरवणुकीत प्रामुख्याने मुख्याध्यापिका सौ. सुजाता कांबळे, पर्यवेक्षक श्री सपकाळ सर, सौ .गुजर मॅडम ,विजय कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, गणेश गुरव ,सौ. नांगरे, सौ .चरणकर, सौ .जोशी, लोंढे ,चौगुले ,गद्रे असे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top