सांगलीतील तरुणाच्या खून प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; मंदिरातील पुजारीच निघाला आरोपी

0

 

सांगली : मंदिरातल्या चोरीतील ऐवज आणि पैसे परत देण्याच्या वादातून चोरी प्रकरणातील संशयित तरुणाचा मंदिराचा पुजारी आणि त्याच्या साथीदारांनी खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कवठेमहांकाळमधील या हत्येप्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्यासह चौघांना अटक झाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) येथील सदाशिव जगन्नाथ चौगुले (वय, २९) या तरुणाचा खून झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने छडा लावत या प्रकरणी वाळव्या नेर्ले येथील वाघजाई मंदिराच्या पुजारासह चार जणांना अटक केली आहे. सौरभ विकास सौदे (वय २१), विठ्ठल मधुकर डोंगरे (वय २०), श्रीकांत चंद्रकांत पाटील (वय २०) आणि संकेत सोमाजी वाठारकर (वय १९, सर्व राहणार नेर्ले तालुका वाळवा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सौरभ सौदे हा वाघजाई मंदिराचा पुजारी आहे. संशयित सदाशिव चौगुले याने वाळवा तालुक्यातील नेर्ले येथील वाघजाई मंदिरातील चोरीतले दागिने व पैसे परत देण्याच्या वादातून हा खून झाला आहे.
वाळवा तालुक्यातील वाघजाई मंदिरामध्ये सहा महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. यावेळी दानपेटीतील रक्कम आणि मुद्देमाल लंपास झाला होता. त्यानंतर कासेगाव पोलिसांनी गुन्ह्यामध्ये मंदिराचे पुजारी असणाऱ्या सौरभ सौदे याचा नातेवाईक सदाशिव चौगुले याला अटक केली होती. काही दिवसांपूर्वी चौगुले जामिनावर बाहेर आला. त्यानंतर चौगुले याने पुजारी असणाऱ्या नातेवाईक सौरभ सौदे याच्याकडे गुन्हा मागे घेण्यासाठी तगादा लावला होता. तर सौदे याने मंदिरातील दागिने आणि रक्कम परत दे गुन्हा मागे घेतो, असं सांगितलं होतं. त्यातून दोघांमध्ये अनेक वेळा वादाचा प्रकार घडला होता. तसंच मंदिर चोरीतील संशयित चौगुले याने पुजारी सौदी याला गुन्हा मागे न घेतल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीनंतर सौरभ सौदे याने सदाशिव चौगुले याच्या हत्येचा कट रचत कवठेमहांकाळ येथील अलकुड ( एस) मधील लंगरपेठ रोडवर चौगुले याचा पाठलाग करत धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा निर्घृण खून केल्याचे तपासात उघडकीस आलं आहे.

This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top