उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला, पुण्यात मोठा कालवा...

0

 


राज्यात गेल्या दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. आज शिंदे गटाते नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पुण्यात होते. यावेळी मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. आज पुण्यात या दोन्ही गटातील वाद शिगेला पोहचला. बंडखोर नेते उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी कात्रज येथे हल्ला करण्याचा प्रयत्न केला. जाहीर सभांमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकमेकांवर नाव न घेता परस्परांवर टीका केली. तानाजी सावंत यांनी थेट कोण आदित्य ठाकरे? असा प्रश्‍न केल्याने या दोन्ही गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

शिवसेनेचे कार्यकर्ते शिंदे गटावर नाराज-
महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार पडल्यानंतर आणि त्यानंतर संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता आक्रमक मूडमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही शिंदे गटावर नाराज आहेत. पुण्यातील शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडल्याने शिंदे गटाच्या आमदारांवर संतप्त झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केल्याचे पाहायला मिळाले.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया-
उदय सामंत म्हणाले, “हा भ्याड हल्ला होता. हल्लेखोरांच्या हातात हत्यारे होते. याबाबत मी पुणे पोलिसांना माहिती देणार आहे. मी शांत आहे पण हतबल नाही.” उदय सामंत यांच्या कारच्या मागच्या बाजूची काच फुटली आहे. मुख्यमंत्री सोबत असताना हा हल्ला झाल्यामुळे शिंदे गटात संतप्त वातावरण आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हा भ्याड हल्ला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकार व पोलिसांची आहे. याबाबत पोलीस कारवाई करतील. मला याबाबत पूर्ण माहिती नाही.”

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top