पोखले ता. पन्हाळा येथील ग्रामपंचायत घंटागाडीचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न...

0

 

पन्हाळा तालुक्यातील पोखले येथे ग्रामपंचायतीच्या वतीने घेतलेल्या घंटागाडीचा लोकार्पण सोहळा आज करण्यात आला. पोखले ग्रामपंचायत हद्दीमध्ये ३५०० हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने गावात दररोज मोठ्या प्रमाणात कचऱ्याची निर्मिती होते. म्हणून घरोघरी जाऊन ओला, सुका कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडीची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षभरापासून गावातून मागणी होत होती. सुमारे ६ लाख रु. खर्चून आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते घटांगाडीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोखले गावचे सरपंच डॉ. पांडुरंग निकम, जयसिंग पाटील, भिमराव माने, कुमार मगधूम, रमजान पठाण, दादासो नाईक, शिवाजी जाधव, माजी ग्रामसेवक शशिकांत निकम, संदिप निकम, गोंविद पाटील, बी.आर.पाटील, सभांजी पाटील आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

This news is co-provided by Janpratisadnews



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top