संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आता आठवले 'रामायण'; आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी असा घेणार फायदा

0
श्रीलंकेत भीषण आर्थिक स्थिती ओढावली आहे. श्रीलंकेतील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नेत्यांसह आता कलाकारांनीही कंबर असली आहे. श्रीलंकेचा खेळाडू सनत जयसूर्या यांने एक मोठी घोषणा केली आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या श्रीलंकेनं आता संकटातून बाहेर पडण्यासाठी रामायणाचा आधार घेतला आहे. श्रीलंकेच्या पर्यटनाची जाहिरात करणाऱ्या खेळाडू जनत सूर्या याने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. श्रीलंकेची अर्थव्यवस्थाही पर्यटनावर अवलंबून आहे. करोना महामारीमुळं पर्यटन ठप्प झालं होतं तर आर्थिक संकटामुळं आता पर्यटनही संकटात सापडलं आहे. त्यामुळं पुन्हा देशाचे पर्यटन बळकट करण्यासाठी सरकार पावलं उचलत आहे. श्रीलंका आणि रामायण यांचे खास नातं आहे. याचा धागा पुढे करत आता भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी श्रीलंका रामायणाचा आधार घेणार आहे. मागील वर्षी मे महिन्यात भारताने श्रीलंकेच्या पर्यटन व्यवसायात मोठा हातभार लावला होता. एकट्या भारतातून ५, ५६२ पर्यटक श्रीलंकेत गेले होते. त्यानंतर यूकेमधून ३, ७२३ पर्यटक श्रीलंकेत आले होते. श्रीलंकेचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार जयसूर्या यांनी कोलंबोतील भारतीय उच्चायुक्त गोपाल बागळे यांची भेट घेतली. भारतीय उच्चायोगने ट्विट करत ही माहिती दिली आहे. श्रीलंकेचे नवनियुक्त पर्यटन ब्रँड अॅबेसिडर व क्रिकेटर सनत जयसूर्या यांनी आज उच्चायुक्त यांची भेट घेतली. भारत व श्रीलंका यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी श्रीलंकेतील पर्यटनाला चालना मिळावी या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली, असं ट्विट उच्चायोगने केले आहे.

भारतीय पर्यटकांसाठी आम्ही रामायणाशी संबंधित स्थळांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत. श्रीलंकेत एकूण ५२ स्थळ ही रामायणाशी संबंधित आहेत. त्या पर्यटन स्थळांना चालना देण्याचा प्रयत्न करत आहोत. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशात २००८ मध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक मान्यतांची देवाण-घेवाण होण्यासाठी एक करार करण्यात आला होता, असं ट्वीट सनथ जयसूर्या यांनी केलं आहे.

रावणाची गुफा
२०१७ साली झालेल्या एका संशोधनात ५० अशी ठिकाणी शोधून काढण्यात आली आहेत ज्याचा थेट संबंध रामायणासोबत आहे. संशोधकांनी रावणाची गुहादेखील शोधल्याचा दावा केला जात आहे. एका डोंगरात ही गुहा असून त्यात रावणाचा मृतदेह सुरक्षित ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. श्रीलंकेत रैगलाच्या जंगलात चट्टान नुमा नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरात रावणाचा मृतदेह अजूनही सुरक्षित ठेवण्यात आला आहे. श्रीलंकेचं रामायण रिसर्च सेंटर आणि पर्यटन विभागाने संयुक्तपणे केलेल्या संशोधनानंतर हा दावा करण्यात आला आहे. या गुहेत रावण तपस्या करत असे, असंही या शोधप्रबंधात दावा केला आहे. रैगला डोंगरात आठ हजार फुट उंचीवर ही गुफा तयार करण्यात आली असून त्यात रावणाच्या मृतदेहाचे जतन करण्यात आले आहे, असा दावा करण्यात येतो आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top