ऑलिम्पिक भारतामध्ये भरवण्याचे स्वप्न होणार साकार, नीता अंबानींनी घेतला मोठा पुढाकार

0

 

भारत गेल्या बऱ्याच वर्षांपासून ऑलिम्पिक भरवण्याचे फक्त स्वप्न पाहत आहे, पण ही गोष्ट सत्यात उतरवण्यासाठी नीता अंबानी यांनी आता पुढाकार घेतला आहे. तब्बल ४० वर्षांनंतर ऑलिम्पिकबाबत एक मोठी गोष्ट भारतामध्ये घडणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत नेत्रदीपक कामगिरी केली आहे. पण ऑलिम्पिक भारतामध्ये भरवण्याचा प्रत्यक्षात विचार मात्र अजूनही केला जात नव्हता. पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी मात्र यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता भारतामध्ये ऑलिम्पिक खेळवण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.

नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर कार्यरत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत भारतामध्ये ऑलिम्पिकची एखादी बैठकही झाली नव्हती. पण नीता अंबानी यांच्या पुढाकारामुळे आता पुढील वर्षी होणारी ऑलिम्पिकची बैठक भारतामध्ये होणार आहे. ऑलिम्पिकची बैठक कुठे आयोजित करायची, याबाबत मतदान घेण्यात आले होते. या मतदानामध्ये ७६ पैकी ७५ मतं ही भारताला मिळाली आहेत. नीता अंबानी या भारताचा एक चांगला चेहरा म्हणून आता पुढे आल्या आहेत. यापुढे भारतामध्ये ऑलिम्पिक भरवण्याचे स्वप्नही साकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत नीती अंबानी यांनी सांगितले की, " भारतामध्ये युवा ऑलिम्पिक आणि मुख्य ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणे हे आमचे स्वप्न आहे. भारत हा जगातीस सर्वाधिक युवा देश आहे, त्यामुळे भारतातील युवांना ऑलिम्पिकची भव्यता आणि विशलता काय असते, हे त्यांनी पाहायला हवे. त्यामुळे आम्ही काही गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत. ऑलिम्पिकची वार्षिक बैठक आता भारतामध्ये होणार आहे आणि ही सर्वात आनंदाची बातमी आहे. हा भारताचा मोठा सन्मान आहे. तब्बल ४० वर्षांनंतर ऑलिम्पिकबाबतची मोठी गोष्ट भारतामध्ये घडत आहे. ही भारतासाठी एक नव्या युगाची सुरुवात आहे. यासाठी मी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची आभारी आहे."
टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने देदिप्यमान कामगिरी केली होती. जेव्हा एखादी स्पर्धा तुमच्या देशात होत असते तेव्हा खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावलेला असतो आणि त्याचा पदक मिळवण्यावरही परीणाम होत असतो. आतापर्यंत भारतामध्ये एकदाही ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आलेली नाही. पण जर ऑलिम्पिक स्पर्धा भारतामध्ये आयोजित करण्यात आली तर नक्कीच त्याचा फायदा खेळाडूंना होऊ शकतो आणि पदकंही वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top