शिंदे-फडणवीसांना १२ कोटी लोकसंख्येतून एकही महिला मिळाली नाही?, मंत्रिमंडळ विस्तारात मोठा अन्याय

0

शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला. पण या मंत्रिमंडळ विस्तारात महिला शक्तीला स्थान देण्यात आलेले नाही. आता विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातील महिल्यांवर हा अन्याय असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे.


राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Shinde Fadnavis Cabinet ) यांच्या सरकारचा पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. भाजपचे ९ आणि शिंदे गटातील ९ अशा एकूण १८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छोटेखानी मंत्रिमंडळात विस्तारात अपक्षांना स्थान देण्यात आलेले नाही. तसेच या मंत्रिमंडळ विस्तातरीत  महत्त्वाची मोठी बाब म्हणजे यात एकही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही.

मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहाटे साडेपाच वाजेपर्यंत बैठक चालली. या बैठकीनंतर दोन्ही बाजूंकडून मंत्रीपदासाठी आमदारांची नावं निश्चित केली गेली. यानंतर सकाळी ११ वाजता राजभवनात १८ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पण यात विस्तारात एकाही महिलेला स्थान देण्या आलेले नाही. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारव राजकीय वर्तुळातून टीका होत आहे.मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असल्यापासूनच एकाही महिलेचे नाव चर्चेत नव्हते. शिंदे-फडणवीस सरकारकडून अचानक धक्का दिला जाईल, अशी शक्यता होती. पण एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने हे फक्त पुरुष प्रधान सरकार असल्याची टीका होतेय. राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे, अशी जोरदार टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनीही टीका केली आहे. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. हा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक आहे, अशी खिल्ली ठाकूर यांनी उडवली आहे.

कोणी कोणी घेतली आज शपथ...

शिंदे गटातील मंत्री -

१. दादा भुसे
२. संदीपान भुमरे
३. उदय सामंत
४. तानाजी सावंत
५. दीपक केसरकर
६. शंभुराजे देसाई
७. अब्दुल सत्तार
८. गुलाबराव पाटील
९. संजय राठोड


भाजपचे मंत्री -

१. सुधीर मुनगंटीवार
२. चन्द्रकांत पाटील
३. राधाकृष्णविखे पाटील
४. गिरीश महाजन
५. अतुल सावे
६. विजयकुमार गावित
७. मंगलप्रभात लोढ
८. सुरेश खाडे
९. रविंद्र चव्हाण

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top