एकटा हार्दिक ठरला पाकिस्तानवर भारी...

0
रविवारी रात्री झालेल्या आशिया चषकाच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. या विजयाचा हिरो होता हार्दिक पांड्या. हार्दिकने आधी गोलंदाजीत धडाका लावला आणि नंतर फलंदाजीतही चांगली कामगिरी केली. भारताला शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती, जी हार्दिकने सहज पूर्ण केली. सामन्यानंतर त्याने सांगितले की, शेवटच्या षटकात गोलंदाज अधिक दडपणाखाली असेल हे मला माहीत होते.
हार्दिक म्हणाला, ‘अशा टार्गेटचा पाठलाग करताना तुम्ही नेहमी ओव्हर बाय ओव्हर प्लॅन करता. मला माहित होते की समोर एक तरुण गोलंदाज आहे आणि डावखुरा फिरकीपटू देखील आहे. 20व्या षटकात माझ्यापेक्षा गोलंदाज जास्त दडपणाखाली असेल हेही मला माहीत होतं. मी येथे गोष्टी साध्या ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्हाला शेवटच्या षटकात फक्त 7 धावा हव्या होत्या पण आम्हाला 15 धावा लागल्या असत्या तरी मी ते केले असते. साधारण एका वर्षापूर्वी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर टी-२० वर्ल्डकपच्या ग्रुप फेरीत पाकिस्तानने भारताचा १० विकेटनी पराभव केला होता. आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात भारताचा झालेला पाकिस्तानविरुद्धचा तो पहिला पराभव होता आणि त्यामुळेच जिव्हारी देखील लागला. त्या सामन्यात ज्या खेळाडूंना व्हिलन ठरवण्यात आले होते त्यामध्ये हार्दिक पंड्याचा देखील समावेश होता. 
हार्दिक पांड्या याने गोलंदाजीतही केला कहर-
हार्दिकने फलंदाजीत धडाकेबाज खेळ करण्यापूर्वी गोलंदाजीतही कहर केला होता. या सामन्यात त्याने चार षटकात 25 धावा देत तीन बळी घेतले. शॉर्ट लेन्थ बॉलवर या तीन विकेट्स मिळाल्या. हार्दिकने मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद आणि खुशदिल शाह यांची विकेट घेतली. यावर तो म्हणाला, ‘गोलंदाजीमध्ये परिस्थितीचे आकलन करणे आणि शस्त्रे वापरणे महत्त्वाचे आहे. शॉर्ट आणि हार्ड लेंथ गोलंदाजी माझी ताकद आहे. माझे लक्ष त्यांना चांगले देणे आणि फलंदाजांना चुका करण्याची संधी देणे यावर होते. भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला-
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा संपूर्ण संघ 147 धावांत गुंडाळला. यानंतर 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघालाही काहीशी गडबड करावी लागली. भारतीय संघाला एका वेळी 34 चेंडूत 59 धावांची गरज होती. येथून हार्दिक पांड्याने दमदार फलंदाजी करत विजय भारताच्या झोळीत टाकला.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top