शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिप्रेत काम नूतन पदाधिकाऱ्यांनी करावे...

0

- राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

- शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार

कोल्हापूर : नंदकुमार तेली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघेंना अभिप्रेत समाजहिताचे आणि पक्षवाढीचे काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.

नुकतीच शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हाप्रमुखपदी सुजित चव्हाण, रविंद्र माने तर महानगरप्रमुखपदी शिवाजी जाधव, महानगरसमन्वयकपदी जयवंत हारुगले, उपजिल्हाप्रमुखपदी किशोर घाटगे,शहरप्रमुखपदी रणजीत जाधव, हातकणंगले तालुका प्रमुख पदावर राहुल सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या हस्ते
जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले,
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यात शिवसेनेची बांधणी करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हावासियांचे शिवसेनेस नेहमीच पाठबळ लाभले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकहिताचे निर्णय घेत असून, त्याचे जनतेतून स्वागत होत आहे. त्यामुळे शिवसेनेत नव्याने सभासद नोंदणीसह पदाधिकारी नियुक्तीस वाढता प्रतिसाद मिळत आहे.
 पुढे क्षीरसागर म्हणाले, नवनियुक्त पदाधिकारी हे शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे पदाधिकारी असून, शिवसेनेचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे "हिंदुत्वाचे विचार आणि ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" या सूत्रानुसार आजपर्यंत शिवसेनेचे अखंडीत काम करत आहेत. शिवसेनेत झालेल्या क्रांती नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरु असून, लोकहिताच्या निर्णयाचे स्वागत जनतेतून होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यास आपण कटिबद्ध असून, जनतेला न्याय देण्याचे काम नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी करावे. तसेच आगामी काळात उर्वरित प्रमुख पदांसह उप-शहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी, युवासेना आदी सर्वच अंगीकृत संघटनावर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून, निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

 यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, संयज संकपाळ, सुनील जाधव, दीपक चव्हाण, सुनील खोत, अश्विनी शेळके, मंदार तपकिरे, विश्वदीप साळोखे, विश्वजित चव्हाण, अंकुश निपाणीकर, अर्जुन आंबी, कपिल नाळे, राज कापसे, रियाज बागवान, निलेश हंकारे, सुरेश माने, आकाश सांगावकर, राज अर्जुनीकर, श्रीकांत मंडलिक आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top