शिंदे-फडणवीस सरकारचं नवं मंत्रिमंडळ, वाचा सर्व १८ नव्या मंत्र्यांची माहिती

0

 

गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला आहे. राजभवनावर हा शपथविधी पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना संधी देण्यात आली आहे.

संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीच विरोध दर्शवला असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे एकाही महिला नेत्याला संधी न देण्यात आल्याने सरकारवर टीका होत आहे.

कोणी कोणी घेतली आज शपथ...

शिंदे गटातील मंत्री -

१. दादा भुसे
२. संदीपान भुमरे
३. उदय सामंत
४. तानाजी सावंत
५. दीपक केसरकर
६. शंभुराजे देसाई
७. अब्दुल सत्तार
८. गुलाबराव पाटील
९. संजय राठोड

भाजपचे मंत्री -

१. सुधीर मुनगंटीवार
२. चन्द्रकांत पाटील
३. राधाकृष्णविखे पाटील
४. गिरीश महाजन
५. अतुल सावे

६. विजयकुमार गावित
७. मंगलप्रभात लोढ
८. सुरेश खाडे
९. रविंद्र चव्हाण

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top