भारताने तब्बल २२ सुवर्णपदकांसह राष्ट्रकुल गाजवलं, पदकतालिकेत पटकावलं मानाचं स्थान

0

 

भारताने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत कमालच केली. भारताच्या खेळाडूंनी यावेळी तब्बल २२ सुवर्णपदकांना गवसणी घातली. या २२ सुवर्णपदकांसह भारताने या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत मानाचे स्थान पटकावले आहे. भारताने या राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ६१ पदकं पटकावली आहे. या स्पर्धेत भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्यपदकांची कमाई केली आहे. भारताकडून सर्वाधिक सुवर्णपदकं ही कुस्तीपटूंनी पटकावली आहे. भारताच्या कुस्तीपटूंनी या स्पर्धेत ६ सुवर्णांसह एक रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली आहे. त्यामुळए भारताने कुस्तीमध्ये एकूण १२ पदकं मिळाली. कुस्तीनंतर भारताला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची पदकं जिंकवून दिली ती वेटलिफ्टिंगने.

भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी यावेळी चमकदार कामगिरी करत तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताला या स्पर्धेत वेटलिफ्टिंग या खेळाने १० पदकं मिळवून दिली. भारताला सुवर्णपदकाची बोहनी वेटलिफ्टिंगनेच करून दिली होती. कारण मीराबाई चानूने भारताला पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. टेबल टेनिसपटूंनी तर यावेळी कमालच केली. कारण भारताने यावेळी तब्बल चार सुवरणपदकं ही टेबल टेनिसमध्ये पटकावली आहे. टेबल टेनिमध्ये भारताने चार सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी सात पदकांची कमाई केली. अचंथा शरथ कमालने सोमवारी सुवर्णपदकाला गवसणी घातली, त्याचे हे १३वे पदक ठरले आहे.

बॉक्सिंग आणि बॅडमिंटन या खेळांनीही भारताला घवघवीत यश मिळवून दिले. भारताने बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे भारताने बॉक्सिंगमध्ये एकूण सात पदकं मिळवली. बॅडमिंटनमध्ये तर भारताच्या पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्विक व चिराग यांनी सुवर्णपदकांची कमाई करून दिली. भारताला अॅथलेटीक्समध्ये आठ पदकांची कमाई करता आली, यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने ज्युदोमध्ये तीन पदकांची कमाई केली. यामध्ये दोन रौप्य आणि एका कांस्पदकाचा समावेश आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताने एकमेव सुवर्णपदक पटकावले. भारताने लॉन बॉलने यावेळी इतिहास रचला. या खेळात भारताने एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावले.

हॉकीमध्ये भारताची सुवर्णपदकाची पाटी कोरीच राहिली. भारताच्या पुरुष संघाला अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महिलांनी यावेळी कांस्यपदक पटकावले. महिला क्रिकेटमध्येही भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण त्यांना रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. भारताने स्क्वॉशमध्ये तीन कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत भारताला या स्पर्धेत २२ सुवर्णांसह एकूण ६१ पदके पटकावता आली आहेत. त्यामुळे भारताने यावेळी पदकतालिकेत टॉप पच देशांमध्ये प्रवेश केला असून त्यांनी चौथे स्थान पटकावले आहे. भारताने यावेळी न्यूझीलंडला धक्का देत चौथे स्थान पटकावले आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top