सांगलीत मध्यवर्ती असलेल्या दत्त मारुती रोडवर गणेश भक्तांची खरेदीसाठी एकच उत्साहवर्धक गर्दी

0 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी )

सांगली मध्यवर्ती असलेल्या दत्त मारुती रोडवर श्री गणेश भक्तांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. कोरोना नंतरचा हा गणेशोत्सव गणेश भक्तांसाठी एक भावभक्तीच्या उत्साहाची एक लाट घेऊन आला आहे. सांगलीचा मध्यवर्ती असलेला दत्त मारुती रोड हा अनेक स्टॉल नी  सजलेला आहे. दत्त मारुती रोड हा गणेश भक्तांचे एक पूर्वीपासून खरेदी करण्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला असून सदरहू स्टॉलमध्ये श्री गणेशाचे मूर्तीचे स्टॉल, पाने -फुले, फळांचे स्टॉल ,आरास डेकोरेशनच्या साहित्यांचे स्टॉल, विविध आरासासाठी लागणाऱ्या कापडी वस्तूंचे स्टॉल, आकर्षक शोभिवंत वस्तूचे स्टॉल ,रांगोळी व नारळांचे स्टॉल आदी स्टॉलनी परिसर संपूर्ण गजबजलेला आहे .गणेश भक्तांची सुद्धा श्री गजानन च्या पूजेसाठी लागणाऱ्या व इतर साहित्य खरेदीसाठी धावाधाव सुरू होती. बराच भाग यातील श्री गणेश मूर्तीचे स्टॉलनी व्यापलेला होता .विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण पॅटर्नमध्ये असलेल्या गणेश मूर्ती तसेच शाडूच्या व प्लास्टरच्या पेणमधून आणलेल्या मूर्ती यांचा यात समावेश होता .एकंदरीत सर्व सांगली शहर श्री गणेशोत्सवासाठी गणेशमय झाल्याचे चित्र दिसत होते. यंदाचा गणेशोत्सवाचा आनंद गणेश भक्तांच्या चेहऱ्यावर एक विशेष भक्ती भाव दर्शवत होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top