कचऱ्यामुळे चमकतील केस आणि त्वचा, फळांच्या आणि भाज्यांच्या साली फेकताना विचार करा...

0

प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते त्यामुळे अनेकजण साली फेकून देतात. पण या साली कचरा म्हणून न बघता तुम्ही त्याचा तुमची त्वचा उजळण्यास मदत घेऊन शकता. फळ आणि भाज्यांच्या साली संभाळून ठेवणारे फारच कमी असतील. या कचऱ्याकडे ब्युटी प्रोडक्ट म्हणून पाहणे महत्वाचे ठरणार आहे. फळे किंवा भाज्यांइतकेच पौष्टिक साले देखील असतात. हे पोषक तत्व विशेषतः त्वचा आणि केसांसाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. कोणत्या फळाची किंवा भाजीची साल कशी वापरता येईल हे तुम्हाला फक्त माहित असणे आवश्यक आहे. त्वचेसाठी साली वापरण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रत्येक फळ किंवा भाज्यांच्या साली चेहऱ्यासाठी फायदेशीर नसतात. चेहऱ्यावर किंवा केसांवर कोणतीही साल लावण्यापूर्वी त्याचा योग्य वापर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही.

​संत्र्यांची साल


संत्र्याच्या सालीत विटामिन सी भरपूर प्रमाणात आहे. या सालीमधून तुम्ही त्याचा रस काढून घेऊ शकता. या साली सरळ तुम्ही चेहऱ्यावर रब देखील करू शकता. ग्लोइंग स्किनकरता हा अतिशय रामबाण उपाय आहे. तसेच संत्र्याची साल सुकवून ती बारीक पावडर रुपात देखील घरी ठेवू शकता. जेव्हा तुम्ही केस धुवाल तेव्हा संत्र्याची पावडर केसांना लावा याचा फायदा केसांवर दिसून येतो. यामुळे हेअर शाइन वाढू शकते.

​आंब्याची साल

आंब्याची साल प्रत्येकाला वाटत असेल काय कामाची असेल. पण फळांचा राजा असलेल्या आंब्याची साल देखील अधिक गुणांनी संपन्न आहे. या सालींची पेस्ट करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. ड्राय स्किन असलेल्या त्वचेला हायड्रेट करण्यासाठी हे अतिशय फायदेशीर असेल.

बटाट्याची साली



बटाट्याची साल काढून त्याचा आतील भाग चेहऱ्यावर चोळा. त्याचा रस त्वचेला घट्ट करतो, त्याच वेळी ते गडद डाग देखील कमी करते. त्याचबरोबर सालांची पेस्ट बनवून केसांना लावल्याने केस लांब आणि चमकदार होतात.

डाळिबांच्या साली


डाळिंबाची साली बघून ती कधी चेहऱ्यावर लावावीत याची कल्पनाही येत नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या फळाची साल उत्कृष्ट स्क्रबचे काम करते. त्यांना वाळवून बारीक करून घ्या आणि जेव्हा तुम्हाला त्वचा स्क्रब करायची असेल तेव्हा कोणत्याही तेलाचे थेंब मिसळा आणि चेहरा स्क्रब करा. यानंतर येणारी चमक तुम्ही स्वतःच लक्षात घेऊ शकाल.

लींबूची साल

लिंबाची साल खायला कडू वाटेल, पण लावल्यावर त्याचे परिणाम मनाला आनंद देणारे असतात. त्यामुळे लिंबाची साल ही चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम आहे. संत्र्याप्रमाणेच लिंबाच्या सालीमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. ते वाळवून पावडर बनवा. पावडरने चेहरा स्क्रब करा किंवा पेस्ट बनवून लावा. केस धुण्यासाठीही हे फायदेशीर आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top