आता कोल्हापूर, सोलापुरात छापे, राज्यात आयकर खात्याची झाडाझडती मोहीम वेगात...

0
कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथे आयकर विभागाची छापे भारी करण्यात आली आहे. या छापेमारीचे थेट कनेक्शन हे सोलापूर आणि पंढरपूरसह अन्य ठिकाणी पडलेल्या साखर कारखान्यावरील छापेमारीशी असल्याचे समोर येत आहे. ज्यांच्या घरावर छापा पडला ते शिरोळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापतींचे पती आहेत. हा छापा गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास पडला त्यानंतर दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती केली त्यानंतर त्यांच्या जयसिंगपूर येथील आलिशान बंगल्याची पाहणी हे आयकर विभागातर्फे करण्यात आली रात्री उशिरापर्यंत पथकाकडून कागदपत्राची तपासणी व चौकशी सुरू होती याबद्दल काय समोर आले आहे हे अद्यापही करू शकले नाही. मात्र, या छापेमारीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर छापेमारी सुरू असतानाच याचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले आहेत. कोल्हापूरमध्येही कारखानदारांच्या संबंधितांवर व भागीदारांच्यांवर ही छापेमारी झाली असल्याचे समोर आले आहे. शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडा येथील तालुका पंचायत समितीच्या माजी सभापतींच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आहे. आयकर विभागाचे पथक गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजताच छाप्यासाठी दाखल झाले.त्यांनी दुपारपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती केली. त्यानंतर जयसिंगपूर येथील त्यांच्या आलिशान बंगल्यांची पाहणी केली. नंतर सांगलीतील त्यांच्या प्लॉटचीही पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत या पथकाकडून कागदपत्रे व चौकशीचे काम सुरू होते. या चौकशीत काय निष्पन्न झाले याची माहिती मिळू शकली नाही.

संबंधित व्यक्तीचा गौण खनिजाचा व्यवसाय असून सोबतच वाळू उपसा बोटी तयार करण्याचा कारखाना आहे. उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील आणखी काही साखर कारखान्यात भागीदारी आहे. या कारखान्यांवर छापेमारी झाल्याने कारखान्यात भागीदारी असलेल्याच्या निवासस्थानांवरही छापा टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पथकाने घरासह परिसराची आणि कागदपत्रांची झाडाझडती घेतली दरम्यान यावेळी येथे मोठा पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. रात्री उशिरापर्यंत अधिकारी या पती-पत्नीकडून माहिती घेत होते.दरम्यान, या छाप्यात भागीदारांचे नेमके काय कनेक्शन आहे का हे अद्याप समजू शकले नाही

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top