कोकणात सर्वात मोठा धक्का, आणखी एक आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत

0
राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी मोठा सत्तासंघर्ष पहायला मिळाला. या सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपशी हातमिळवणी केली केली आणि राज्यात नवं सरकार अस्तित्वात आणलं. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या ४० आमदार आणि १२ खासदारांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांना समर्थन दिल. यानंतर ठाकरे यांना दिवसेंदिवस धक्क्यांवर धक्के बसत आहेत. यानंतर आता ठाकरे यांना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
कोकणातील शिवसेना आमदार राजन सावळी हे शिंदे गटात जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. शिवसेनेचे कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांचा समावेश आहे. यापैकी एक आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असल्याचं निदर्शनास आलय. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच साळवी यांनी भेट घेतल्याने उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. कोकणातून दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यानंतर राजन साळवी हे देखील उद्धव ठाकरे गटाची साथ सोडण्याची चिन्हे आहेत. साळवी शिवसेनेशी एकनिष्ठ राहण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र तेदेखील शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. येत्या ४८ तासांत ‘तो’ आमदार शिंदे गटात दाखल होऊ शकतो, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली तर ठाकरेंना कोकणातील हा सर्वात मोठा धक्का असणार आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top