सांगलीत काल सलग दुसऱ्या दिवशी साथीदार फाउंडेशनने आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवगर्जना गोविंदा मंडळाने एक लाख अकरा हजार रुपये बक्षीसासह प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले

0
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 
     (अनिल जोशी)
काल परत एकदा तरुण भारत स्टेडियम मध्ये साथीदार फाउंडेशनने भरवलेल्या दहीहंडी स्पर्धेत तासगावच्या शिवगर्जना गोविंद मंडळाने गर्जना करत एक लाख अकरा हजार रुपये पारितोषिकासह प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. सांगलीकर तरुणाईचा तरुण भारत स्टेडियम मध्ये डीजेच्या व लेसर किरणाच्या तालावर नाचण्यासाठी एकच जल्लोष झाला होता. फटाक्यांच्या अातिषबाजीने व लेसर किरणाने तरुण भारत स्टेडियमचा परिसर दुमदुमून गेला .सांगलीकरांनी तुफान गर्दी केली होती तसेच तरुण भारत स्टेडियम गर्दीने खचाखच भरले होते. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत शिवगर्जना तासगाव ,नाईक ग्रुप चिंचणी, अजिंक्यतारा मंडळ कुटवाड ,जय महाराष्ट्र मंडळ आदि संघ सहभागी झाले होते .लेसर शो ,बॉलीवूड डान्स मुळे कार्यक्रमात फारच रंगत आली होती .आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते शिवगर्जना गोविंद संघाच्या मंडळास एक लाख अकरा हजार रुपये बक्षीसासह गौरवण्यात आले. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ऑनलाईन शुभेच्छा देऊन नगरसेवक धीरज सूर्यवंशी यांनी केलेल्या दहीहंडी स्पर्धेच्या आयोजनाबद्दल प्रशंसा केली व कौतुक केले. सदर कार्यक्रमास भाजपचे नेते शेखर इनामदार, महापालिका गटनेते विनायक सिंहासने ,नगरसेवक संजय कुलकर्णी ,मोहन वानखडे यांची उपस्थिती लाभली.अक्षय भोसले ,वशिम शिकलगार, सुरज यादव ,योगेश मुळीक ,अमित पाटील आदी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचे रंगतदार नियोजन केले.

This news is co provided by Janpratisadnews

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top