आदित्य ठाकरे केवळ एक साधा आमदार, त्यापेक्षा जास्त काही नाही: तानाजी सावंत

0

 


आदित्य ठाकरे हे केवळ एक आमदार आहेत. त्यापलीकडे मी त्यांना फार महत्त्व देत नाही, असे वक्तव्य एकनाथ शिंदे गटाचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज पुण्यातील कात्रज चौकात सभा घेणार आहेत. हे ठिकाणी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या कार्यालयापासून काही अंतरावर आहे. त्याचवेळी आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेही कार्यक्रम आहेत. मुख्यमंत्री आज पुण्यात आढावा बैठकीसाठी येणार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची सभा असून ते तानाजी सावंत यांनाही भेटणार आहेत. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांची सभा नेमका हाच मुहूर्त साधून कात्रज चौकात ठेवण्यात आली का, असा प्रश्न तानाजी सावंत यांना विचारण्यात आला. आदित्य ठाकरे मुद्दाम तुमच्याविरोधात शक्तीप्रदर्शन करत आहेत का, असे सावंत यांना विचारण्यात आले. त्यावर तानाजी सावंत यांनी आक्रमकपणे प्रत्युत्तर देताना म्हटले की, आदित्य ठाकरेंचं शक्तीप्रदर्शन कसलं, त्यांचा तर शक्तीपात झाला आहे. आमची सगळी शक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी आहे. एकही शिवसैनिक त्यांच्या पाठिशी राहिलेला नाही. आदित्य ठाकरे हे कोण आहेत? तो फक्त एक साधा आमदार आहे. यापेक्षा जास्त महत्त्व मी त्याला देत नाही, असे तानाजी सावंत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील उद्यानाला एकनाथ शिंदेंचं नाव दिल्याने वाद

महापालिकेच्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देण्याचा प्रताप हडपसर येथील शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने केला होता. या उद्यानाचं उद्घाटन स्वत: एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच होणार होते. मात्र सर्वच स्तरातून झालेल्या टीकेनंतर हा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्यानांना कुटुंबातील व्यक्तींची किंवा वैयक्तिक नावे देता येणार नाहीत, असा ठराव महापालिकेकडून करण्यात आलेला असतानाही माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव उद्यानाला दिल्याने शहरातील नागरिकांनी याला विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर सदर उद्यानाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते होणार नसल्याचा खुलासा भानगिरे यांनी काहीवेळापूर्वीच केला आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top