सांगलीत गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या आरास डेकोरेशनच्या साहित्याच्या स्टॉलनी बाजारपेठ सजली

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क -
(अनिल जोशी)

जिल्ह्यात कोरोना नंतरच्या काळातील प्रथमच सांगलीची मध्यवर्ती असलेली बाजारपेठ विविध नाविन्यपूर्ण आरास डेकोरेशनच्या साहित्याच्या स्टॉलनी सजली आहे. बाजारपेठेत गेल्यानंतर श्री गणरायाच्या आगमनाची चांगलीच जाणीव होत आहे .सर्वच स्टॉलमध्ये विविध रंगी नैसर्गिक वाटणारी प्लास्टिकची अत्यंत देखणी सुरेख फुले व त्यांची तोरणे ,डेकोरेशन साठी लागणारे थर्माकोलचे विविध पॅटर्नमध्ये असलेली आकारातील मखरे ,विविध प्रकारची तोरणे, घरगुती छोटे कापडी मंडप ,लाईट मध्ये चकाकणाऱ्या झुरमुळ्या ,विविध आकाराचे चौरंग ,सोनेरी व अन्य रंगांमध्ये असलेले कापडी पडदे, चकाकणाऱ्या विविध आकाराच्या शोभिवंत वस्तू, रंगीत लाईटच्या माळा आदी साहित्यांनी स्टॉल सजले आहेत .यावर्षीच्या लागणाऱ्या आरास डेकोरेशनच्या साहित्याच्या किंमतीमध्ये सुमारे २५% वाढ झाल्याचे स्टॉल व्यापाऱ्यांचे म्हणणे असून खरेदीसाठी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे दिसत आहे .कोरोना नंतरच्या काळातील साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासाठी श्री गणरायाच्या आगमनाची सांगलीकर नगरी आतुरतेने वाट पाहत आहे. सर्वत्र वातावरण एकदम उत्साहवर्धक व आनंददायक असल्याचे बाजारपेठेतील चित्र आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेला दत्त मारुती रोड स्टॉलच्या रोषणाईने उजाळून निघाल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top