आय टी व आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सिबीक इन्स्टिट्यूट ठरेल वरदान..!

0

 

- संस्थापक पारस ओसवाल यांची माहिती

- सहा महिन्यांची इंटरशिपसह मानधन (विद्यावेतन)

- एक ते दीड वर्षांचे व्यवसायाभिमुख डिप्लोमा कोर्सेस

- नोकरी व व्यवसायाची हमी


कोल्हापूर : नंदकुमार तेली

कोल्हापुरात "स्किल नॉलेज प्रोव्हायडर"च्या धरतीवर सिबिक इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आले आहे. ही इन्स्टिट्यूट आयटी व आरोग्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी वरदान ठरेल. तसेच या विद्यार्थ्यांना वर्क फ्रॉम होम प्रमाणे वर्क फ्रॉम कोल्हापूरचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती संस्थापक पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी पारस ओसवाल म्हणाले , या संस्थेत इंडिया फर्स्ट इनक्यूबेटेड इन्स्टिट्यूट विथ स्टार्टअप इको सिस्टीम जी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संलग्नित असे सहा महिन्याच्या इंटरशिप सह एक ते दीड वर्षांचे व्यवसायाभिमुख डिप्लोमा कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याद्वारे नोकरी व इन हाऊस इनक्युबेशन सेंटरमुळे व्यवसायांच्या हमी देण्यात येत आहे. बीएससी, बी फार्म, बी ए एम एस व इतर वैद्यकीय पदवीधारकांना आरोग्य सेवेतील करिअर व व्यवसायाची हमी देणारा कोर्स अत्याधुनिक सुविधांसह कोल्हापुरात प्रथमच सुरू करण्यात आला आहे. ही विद्यार्थ्यांसाठी करिअरची संधी असून आयटी ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सह सर्व क्षेत्रात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नामी संधी मिळणार आहे. हा विद्यार्थ्यां साठी करिअर सह व्यवसायांचा महामार्ग व प्रगतीचा राजमार्ग ठरणार आहे. 


पुढे ओसवाल म्हणाले, ही संस्था लवकरच स्टेशन रोडवरील कैलास टॉवरच्या चौथ्या मजल्यावर सुरू करण्यात येणार असून इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 


संचालक डॉक्टर संजय दाभोळे म्हणाले, या संस्थेत ॲडव्हान्स डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन सप्लाय चैन मॅनेजमेंट अँड लॉजिस्टिक कोर्स, डिप्लोमा इन मेडिकल इक्विपमेंट मेन्टेनन्स व ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स आदी कोर्सची उपलब्धता असणार आहे. हे कोर्स एक ते दीड वर्षांच्या कालावधीचे आहेत. यात सहा महिन्यांची इंटरशिप असून या काळात मानधन (विद्यावेतन) देण्यात येणार आहे. याचा लाभ आयटी व वैद्यकीय क्षेत्रात करियर घडविणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रशिक्षणाबरोबर सहा महिन्याच्या इंटर्नशिप कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रॅक्टिकलचा अनुभव मिळणार आहे. तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंट ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांनी करिअर घडविण्यासाठी याचा लाभ द्यावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी सीईओ सूर्यकांत दोडमिसे, संचालक प्रतीक ओसवाल, विश्वजीत खाडे, प्रिन्सिपल अमृता माने आदी उपस्थित होते.


This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top