शिर्डीतून लोकसभेला यावेळेस लढणार, पण पडणार नाही; आठवलेंचा दावा

0
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदार संघातून 2009 साली केंद्रीय मंत्री रामदास आठवले पराभूत झाले होते. मात्र त्यांनी त्याच मतदार संघातून पुन्हा निवडणूक लढविण्याची इच्छा काल त्यांनी बोलून दाखविली. जनता, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप व शिंदे गटाची मागणी आणि निवडून येण्याचे वातावरण असेल तर मी शिर्डीतून निवडणूक लढेल, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले.
आठवले खाजगी कामासाठी नगरला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पुन्हा एकदा शिर्डीतून लढण्याचा विषय निघाला. त्यावर ते म्हणाले, केंद्रीय मंत्रिपदाच्या माध्यमातून नगर व शिर्डी येथे मोठे औद्योगिक प्रकल्प आणण्यात येतील. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी २०२४ मध्ये लढण्यात इच्छुक आहे. यावेळेस लढणार आहे पण पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले कि, २००९ साली बाळासाहेब विखे यांना दक्षिणेतून लढायचं होतं. पण राष्ट्रवादीने त्यांना जागा सोडली नाही. त्यामुळे विखे यांनी शिर्डीत आपल्याला पाठिंबा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला असता तर त्याचवेळी आपण पडलो नसतो. पण आता चित्र वेगळं आहे, असे आठवले म्हणाले. तसेच मला अनेक लोकांचे फोन येतात त्यावेळेला आमची चूक झाली, तर आता माझे प्रामाणिक इच्छा आहे मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top