दहावी उत्तीर्णांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी, ECIL मध्ये मेगाभरती...

0
इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronic Corporation Of India Limited, ECIL) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत अनेक ट्रेड अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार ECIL च्या अधिकृत वेबसाइट ecil.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी (ECIL Recruitment 2022) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.ecil.co.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी (ECIL Job 2022) थेट अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण २८४ पदे भरली जातील.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षादरम्यान असावे. ओबीसी उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे तर एससी, एसटी उमेदवारांसाठी ३० वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

८ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top