मायग्रेन, अपचन, आंबट ढेकर येणे, बद्धकोष्ठता या आजारांवर प्रभावी उपाय; पेरू खाण्याचे 10 आरोग्यवर्धक फायदे

0
बाजारात सहज उपलब्ध होणारे, खिश्याला परवडणारे, चवीला आंबट, तुरट असणारे पेरू हे फळ आपल्याला नक्कीच आवडत असेल; आणि आवडत नसेल तरीसुद्धा हि माहिती वाचल्यानंतर आपण ते नक्कीच खायला सुरुवात कराल असा आम्हाला विश्वास आहे. पेरू हे भारतीय फळ आहे. हिंदीमध्ये याला अमरूद असे म्हटल जात. पेरू खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज त्यापैकीच 10 महत्वाचे फायदे आपण जाणून घेणार आहोत. पेरूमध्ये एंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, पोटॅशिअम, फायबर असे पोषक घटक असतात. 

सकाळी काळी मिरी, काळे मीठ लावून पेरू खाल्याने अपचन, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे, बद्धकोष्ठता या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आवश्यक असणारे एंटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे पोषक घटक पेरूमध्ये असतात.

पेरुचा गर शरीरावर लावल्याने त्वचेतील अशुद्धी दूर होतात. पेरूमध्ये असणारे व्हिटॅमिन ए हा पोषक घटक आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगलं राखण्यास मदत करतो.

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा हा आजार होण्याची शक्यता असते. नियमित पेरूचे सेवन केल्याने रातांधळेपणा होण्याची शक्यता कमी होते. पेरूचे सेवन केल्याने तोंडाला चव येते, भूक चांगली लागण्यास मदत मिळते.

मायग्रेनच्या त्रासामुळे डोके दुखत असल्यास कच्चा हिरवा पेरू दगडावर घासून पेस्ट तयार करा. हि पेस्ट दुखत असलेल्या भागावर लावा. चांगल्या परिणामासाठी हा उपाय दिवसातून तीन ते चार वेळा करा.

तोंडाला फोड आले असल्यास पेरूची कोवळी पाने चघळल्याने आराम मिळतो. पेरूच्या पानांचा काढा करून त्याने गुळणा केल्याने दंत विकार तसेच हिरड्यांची सूज दूर व्हायला मदत मिळते.

आपल्याला पेरू खाण्याचे 10 आरोग्यवर्धक फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top