सांगली जिल्हा परिषदेच्या मार्फत दिल्या जाणाऱ्या 10 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 अनिल जोशी


सांगली जिल्हा परिषदेमार्फत दिल्या जाणाऱ्या यंदाच्या वर्षीच्या 10 जिल्हा शिक्षक पुरस्कारांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आलेली आहे. सदरहू  10 जिल्हा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करताना, गुणांकन निकषाच्या आधीन राहून करण्यात आलेली आहे. सांगली जिल्ह्यातून एकूण 21 प्रस्ताव शिक्षकांमधून दाखल झाले होते. यातून 10 जिल्हा शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी दिली आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या पुरस्कार निवड समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांचे अध्यक्षतेखाली होऊन, निवड समितीचे अन्य सदस्य मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, शिक्षण अधिकारी , समाज कल्याण अधिकारी, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अन्य सदस्य यांचे उपस्थितीत झाली. सदरहू 10 जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा, सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी, दुपारी दोन वाजता , *शिक्षक दिनाचे औचित्य* साधून जिल्हा परिषदेच्या वसंत दादा पाटील सभागृह येथे संपन्न होणार आहे. सदर जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणाऱ्या शिक्षकांना त्यांचे पत्नीसह शाल , फेटा , पुरस्कार प्रमाणपत्र,  ओटी साहित्य, पुस्तक ,रोख रुपये 500 देऊन गौरविण्यात येणार आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेल्या 10 शिक्षकांची नावे व गावे खालील प्रमाणे आहेत .---अमोल बाबासाहेब सातपुते ,नागरगोजेवाडी ,बेडग( मिरज ),दीपक कुमार शिवाजी कांबळे, अलखूड , (कवठेमहांकाळ ), दिलीप मारुती वाघमारे ,पांडोझरी,( जत), अजय महादेव काळे ,दहिवडी, (तासगाव), धनाजी मारुती साळुंखे, पारे ,(खानापूर ),सौ माधुरी वैभव दिवटे ,(आटपाडी ),सौ फरीदा रमजान मकानदार , आष्टा (वाळवा), उत्तम श्रीपती कदम ,नाटोली (शिराळा), विजय बाबू झेंडे, तावदरवाडी (धनगाव, पलूस ), जनार्दन तातोबा ढाणे ,खेराडे वांगी, (कडेगाव).

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top