आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रायथलॉन डयअथलॉन स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी.

0


- कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांची माहिती


कोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी, नंदकुमार तेली)


कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबतर्फे शहरात रविवार दि.2 ऑक्टोबर 2022 रोजी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ट्रायथलॉन डयअथलॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.


यावेळी बोलताना चेतन चव्हाण म्हणाले, स्पर्धा रविवारी सकाळी सहा वाजता सुरू होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये दोन किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि 21 किलोमीटर धावणे अशा स्वरूपात ही स्पर्धा असणार आहे. यामध्ये राजाराम तलाव येथे दोन किलोमीटर पोहणे, राजाराम तलाव ते तवंदी घाट 90 किलोमीटर सायकलिंग आणि शिवाय विद्यापीठ रोडवर 21 किलोमीटर धावणे आदी स्पर्धांचा समावेश आहे.


यानंतर बोलताना क्लबचे आकाश कोरगावकर म्हणाले या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशातून 750 स्पर्धकांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला आहे स्पर्धेची नोंदणी पूर्ण झाले आहे. 

पुढे बोलताना कोरगावकर म्हणाले, स्पर्धा संयोजकांतर्फे प्रत्येक सहभागी स्पर्धकास कीट व रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेतील विजेत्यांना फिनिशर्स टी-शर्ट मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच 250 स्वयंसेवक या स्पर्धेसाठी सज्ज असून सुरक्षिततेसाठी डॉक्टर ॲम्बुलन्स याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब ही एक सामाजिक संस्था असून यामध्ये खेळाडू व आयर्न मॅन सहभागी आहेत.4 तसेच स्पर्धेसाठी विलो, रगेडियन यांचे सहकार्य लाभले आहे. या पत्रकार परिषदेस डॉ विजय कुमारकनी, खुशबू तलरेजा आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top