महाराष्ट्रातील भाजप- शिवसेना (शिंदे गट )सरकार मराठा समाजाला 2024 पर्यंत आरक्षण मिळवून देईल - सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

0 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)


 मागील सरकार मधील चुकीच्या लोकांमुळे ,मराठा समाजाला आरक्षण मिळालं नसून, आमचे सरकार 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असे आश्वासन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी उस्मानाबादच्या दौऱ्यात केले आहे. महाराष्ट्र राज्यात 2020 सालात चुकीच्या लोकांनी सरकार स्थापन करून, मराठा समाजास आरक्षण मिळवून देण्यात अपयशी झाले आहेत अशी टीका सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. मागील सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षणाची बाजू भक्कम मांडण्यात अयशस्वी झाल्याने सध्याची परिस्थिती मराठा समाजावर आरक्षणाबाबत ओढावलेली आहे तसेच त्यावेळी चुकीचे लोक सरकारमध्ये असल्याने, मराठा समाजावर ही परिस्थिती आलेली आहे .त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण गेले असून, आता 2024 पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाला निश्चित आरक्षण मिळवून देतील असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे .सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत हे आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी परंडा शहरातील मराठा आरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. तानाजी सावंत यांची भेट घेऊन निवेदन दिले त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top