क्रांतिवीर तरुण मंडळाने जोपासली 29 वर्षांची परंपरा...

0

- गणेशोत्सवानिमित्त लोकोपयोगी उपक्रम 

- यंदाच्या वर्षी महाप्रसाद वाटप

- 2 हजार पेक्षा अधिक गणेश भक्तांनी घेतला लाभ

- व्हनाळी  (ता.कागल) येथील

क्रांतिवीर तरुण मंडळाचा उपक्रम


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क ( कोल्हापूर) :  नंदकुमार तेली  

व्हनाळी  (ता.कागल) येथील क्रांतिवीर तरुण मंडळातर्फे गेल्या 29 वर्षांपासून लोकोपयोगी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे यात खंड पडला होता. मात्र, कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याने जनजीवन सुरळीत झाले. यामुळे यंदाच्या वर्षी मंडळांने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाप्रसाद वाटप उपक्रम राबवण्यात आला. याला सुमारे  हजार पेक्षा अधिक गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाने गेल्या २९ वर्षांपासूनची सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिकसह लोकोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा कायम राखली असून गणेशभक्त व ज्येष्ठ नागरिकांतून मंडळाच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.


लोकोपयोगी उपक्रम राबविण्याची मंडळाची 29 वर्षांची परंपरा 

क्रांतिवीर तरुण मंडळाची स्थापना २ऑगस्ट १९९३ रोजी झाली असून गेल्या २९ वर्षांमध्ये मंडळाने आतापर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिकसह लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. कोरोना काळातील दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाही मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करून महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबवला याला गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रसादाचा लाभ घेतला लोकोपयोगी उपक्रम राबवण्याची 29 वर्षांची परंपरा मंडळांने अखंड राखली आहे

यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात...! 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजेच  गणेशोत्सव सण साजरा करण्यावर मर्यादा आल्या होत्या. कोरोना रुग्णसंखेत घट झाल्याने जनजीवन पूर्व पदावर येण्यास प्रारंभ झाला. यामुळे यंदाचा गणेशोत्सव निर्बंध मुक्त साजरा करण्या स प्रशासनाकडून मान्यता मिळाली. या संधीमुळे मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यावर भर दिला आहे.


 -  2 हजार पेक्षा अधीक गणेश भक्तांना मिळाला "महाप्रसादाचा लाभ"

 यंदाच्या वर्षी क्रांतिवीर तरुण मंडळातर्फे मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा लाभ गावातील व भागातील सर्व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सुरेश जाधव यांनी केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाव व परिसरातील सुमारे 2 हजारपेक्षा अधिक गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.


यांनी घेतले परिश्रम. 

हा महाप्रसादाचा उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुरेश जाधव, उपाध्यक्ष बाबुराव कौंदाडे, सचिव दत्तात्रय कुळवमोडे, खजिनदार संदीप कौंदाडे, चंद्रकांत कौंदाडे, रविंद्र कौंदाडे, तानाजी कौंदाडे, राजाराम वाडकर, राजाराम जाधव, धनाजी जाधव, उत्तम जाधव, दिनेश जाधव, राहुल जाधव, अमोल जाधव, संजय पालकर, जयदीप कौंदाडे, दत्तात्रय कळंत्रे, राज कळंत्रे, वसंत कालेकर, किसन कालेकर आदींसह मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top