कोल्हापूर मुंबई विमानसेवा 5 ऑक्टोबर पासून नियमित सुरू होणार असून त्याबरोबरच नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे आदेश.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
 (अनिल जोशी)

कोल्हापूर- मुंबई विमान सेवा 5 ऑक्टोबर पासून नियमित सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली .त्याबरोबरच कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा असे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. नुकतीच कोल्हापूर येथे विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली आहे .त्यावेळी त्यांनी सविस्तर विस्तृत कोल्हापूर विमानतळाच्या अडचणी बाबत चर्चा केली. सदरच्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने ,माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक कार्यकारी संचालक जे .टी. राधाकृष्णन ,विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होते. कोल्हापूर शहर हे राज्यातील महत्त्वाचे शहर असल्याने, प्रगती व विकास जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूर मधून विविध राज्यांना जोडण्याची विमानसेवा, लवकरात लवकर सुरू होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. या सर्व दृष्टीने विमानतळ विस्तारीकरणाची कामे दर्जेदार व जलदगीतेने होण्याची गरज असून विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या 64 एकर भूसंपादनाची प्रक्रिया जलद पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असून ,पावर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया एच ती लाईनचे शिफ्टिंग ,टर्मिनल बिल्डिंग चे डिझाईन करताना ग्रीन बिल्डिंग करणे , विस्तारीकरण अंतर्गत नेली- तामगाव रोडचे शिफ्टिंग कामे गतीने पूर्ण करण्याची यावीत, अशा सूचना केल्या आहेत .उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ,कोल्हापूर -मुंबई विमानसेवा 5 ऑक्टोबर पासून सुरू करणार असल्याचे सांगून ,विमानतळ विस्तारीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे सांगितले .

विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी विमानतळ विस्तारीकरण कामाच्या  सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली .यावेळी विमानतळ विस्तारीकरण कामे, भूसंपादन प्रक्रिया ,रनवे नाईट लँडिंग, देशातील विविध शहरांना जोडणाऱ्या विमान सेवेचे मार्ग सुरू करणे आधी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top