सांगली शहरात" गणपती बाप्पा मोरया ""मंगलमूर्ती मोरयाच्या" गजरात विघ्नहर्ता श्री गणरायाचे घरोघरी जल्लोषात आगमन.

0


 
 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)

 सांगली शहरात घरोघरी विघ्नहर्ता श्री गणरायाचे आगमन चैतन्यमय वातावरणात झाले .आपल्या पूर्वंपार चालत आलेल्या  रिती-रिवाजाप्रमाणे घरोघरी श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती व्यग्र होती. ठिकठिकाणी घरातील मोठ्या व्यक्तींशिवाय लहान मुलांमध्ये या गणेशोत्सवाचा प्रभाव जास्त जाणवत होता .घरातील विघ्नहर्ता श्रींच्या मूर्तीला नेताना लहान मुलांचा *गणपती बाप्पा मोरया चा* गजर व *विविध वाद्यांचे गजर* हा धार्मिक उत्सवांचे वातावरण निर्मिती होण्यास उद्युक्त ठरत होता .सुरुवातीपासूनच घरोघरी लहान मुलांनी सुंदर डेकोरेशनची आरास करून आपापल्या घरात गणेशोत्सवाचे चैतन्यमय स्वरूपातील वातावरण निर्मिती केली होती. घराघरातील प्रत्येक दारात सडा घालून, विविध प्रकारच्या रांगोळ्यांचे चित्रे रेखाटून, सनईच्या मंगलमय सुरात, प्रत्येक कुटुंबातील वातावरण गणेशमय होऊन गेले होते .नंतर विधीवत श्री गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना, पूजा आरती करून मंगल मूर्ती बाप्पा विराजमान झाल्याचे दिसत होते.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top