महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांचे मानधन १५००० रुपये करून शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करू - महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 


महाराष्ट्र राज्यातील शिक्षण सेवकांचे मानधन १५००० रुपये करणार असून , शिक्षकांची अशैक्षणिक कामे त्वरित बंद करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी रत्नागिरी येथे दिले. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांची ३१०००रिक्त पदांपैकी ५० टक्के पदे तातडीने भरणार असून , यापूर्वीचे शाळेच्या वर्गात फोटो लावण्याचे परिपत्रक रद्द करणार आहे. प्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करून ,त्यांच्या विविध मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर याना दिले .या सर्व प्रलंबित मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊ असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. यासोबतच विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची जास्तीत जास्त पदे शिक्षकांच्यातून भरणे, कोविड काळात मृत शिक्षकांची विमा कवचाची रक्कम त्वरित त्यांचे खातेवर वर्ग करणे, यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे व मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, कोषाध्यक्ष संभाजी बापट ,रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर, माधवराव पाटील, वसंतराव हरगुडे, राजाराम वरुटे, हनुमंत शिंदे व अन्य शिक्षक नेत्यांनी रत्नागिरी येथे शिक्षण मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर मागण्यांबाबत चर्चा केली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top