महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या ३१४७२रिक्त राहिलेल्या पदांमुळे राज्यातील अनेक शाळांमधील शैक्षणिक दर्जा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचा विकासाचा दर्जा खालावला

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी )

महाराष्ट्र राज्यात शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षण विभागाला सध्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांची सध्या ३१४७२ पदे रिक्त असून गेली काही वर्षे रिक्त पदांची संख्या ही दिवसें दिवस वाढतच चाललेली आहे. दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची संख्या ही लक्षणीय वाढ दर्शवत आहे. शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक शिक्षक भरतीच्या वेळी पदोन्नतीचा भाग देखील विचारात घेतला पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील फक्त जिल्ह्यातच नव्हे तर दुर्गम डोंगराळ भागात सुद्धा अनेक शाळा आहेत. महाराष्ट्र राज्याच्या जिल्ह्याच्या शिक्षण अंतर्गत क्षेत्रात अनुक्रमे जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिकेच्या ,नगरपालिकेच्या व छावणी परिषदेच्या शाळा येतात. यातील शिक्षण क्षेत्रातील शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी सदर रिक्त प्राथमिक शिक्षक पदांची भरती लवकरात लवकर करणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या राज्यातील शाळेमधील असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे वर बऱ्याच समस्यांचा ताण वाढला आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या धोरणानुसार राज्यात एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये व दुसरीकडे सदरहू प्राथमिक शिक्षकांची रिक्त मंजूर असलेली पदे भरली जाऊ नयेत हे महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणाशी विसंगत असल्याचे चित्र आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांचेवर शिक्षणा व्यतिरिक्त अन्य शासकीय योजना राबवण्याचे सुद्धा काम दिलेले असते. परिणामी प्राथमिक शिक्षकांचेवर अतिरिक्त कामाचा 
ताण येत असल्याचे दिसते.सध्याच्या शाळांमधील गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात्मक गुणवत्ता सुधारायची असेल तर सदरहू प्राथमिक शिक्षकांची ३१४७२ रिक्त असलेल्या पदांची भरती तत्काल करणेत यावी व महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने यावर त्वरित कार्यवाही करावी असे शिक्षण क्षेत्रातील तज्ञ ,शिक्षक ,पालक व विद्यार्थ्यांची मागणी आहे .प्राथमिक शिक्षकांच्या पदांची सध्याची स्थिती खालील प्रमाणे
१) जिल्हा परिषद ---मंजूर पदे-- २१९४२८ ,कार्यरत पदे ----१९९९७६, रिक्त पदे-- १९४५२
२) महानगरपालिका शाळा ---मंजूर पदे-- १९९६० ,कार्यरत पदे --८८६२, रिक्त पदे--११०९८
३) नगरपरिषद शाळा ---मंजूर पदे-- ६०३७,कार्यरत पदे --५१३६, रिक्त पदे --९०१
४) छावणी शाळा ---मंजूर पदे --१६६ ,कार्यरत पदे --१४५, रिक्त पदे-- २१ अशी एकूण प्राथमिक प्राथमिक शिक्षकांची ३१४७२ पदे रिक्त आहेत.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top