सांगली जिल्हा परिषदेकडून लम्पी त्वचारोगाच्या प्रादुर्भावावर घर टू घर अभियान राबवून जनावरांच्या आरोग्याचा सर्वे करण्याबाबतच्या सूचना

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)


 सांगली जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात लम्पी त्वचारोगाच्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी, घर टू घर जाऊन, जनावरांच्या आरोग्याचा सर्वे करा अशा सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केल्या आहेत. सांगलीचे जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी ऑनलाइन बैठक आयोजित केली होती. सदरहू बैठकीस पशुसंवर्धन विभागातील अधिकारी ,कर्मचारी व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते. यावेळी लम्पीरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाय योजनांच्यावर मुद्देसूद चर्चा करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात घर टू घर जनावरांच्या आरोग्याचा सर्वे करून ,तालुक्याच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना सत्वर अहवाल सादर करण्यात यावा व त्यानंतर संबंधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो अहवाल जिल्हा परिषदेकडे सादर करावा. सांगली जिल्ह्यात आत्तापर्यंत फक्त सहा जनावरांना लम्पीत्वचारोगाची लागण झाली आहे . जिल्हा परिषदेकडील सादर करण्यात आलेल्या अहवालाच्या आधारे, जिल्ह्यात चांगली- सदृढ जनावरे किती ? व आजारी जनावरे किती ? याची संख्या समजून त्यावर योग्य ती उपायोजनांची कार्यवाही करता येईल .जिल्ह्यात लम्पीत्वचारोगाची लक्षणे आढळणाऱ्या जनावरास त्वरित विलगीकरण करण्याच्या सूचना पशुपालकांना देण्यात याव्यात अशी सूचना जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केली आहे. जिल्ह्यात लम्पीत्वचा रोगावर मात करण्यासाठी, विविध उपायांची योजना तयार करण्यात येऊन, सक्षम यंत्रणा उभारण्यात येत आहे. सद्य परिस्थिती जनावरांची खरेदी- विक्री ,जनावरांच्या शर्यती, या काही दिवस बंद ठेवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी केले आहे तसेच सदरहू लम्पीत्वचारोगाची रोग हा जनावरांपासून जनावरास होत असतो, त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही असे त्यांनी सांगितले. आहे .सद्यस्थितीत शासनाकडून सदरहू लम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा हजार लसी, आमच्या मागणीनुसार उपलब्ध झाल्या आहेत तसेच आणखी लस्सींची उपलब्धता होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून, शासन स्तरावर योग्य ते प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात सदरहू लम्पीत्वचा रोगाचा प्रसार रोखण्यासाठी स्वतंत्र लसीकरण पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top