आत्ताच बदला तुमची सवय, उशीखाली फोन ठेवून झोपणं ठरेल धोकादायक...

0

अनेक लोकांना असं वाटतं की, मोबाईल फोनमधून निघणाऱ्या रेडिएशनचे आपल्या आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतात. तर काही जण असं म्हणतात की, उशीखाली फोन ठेवून झोपल्याने मेंदूतील सेल्युलर पातळी कमी होऊ शकते. आपल्याला अनेक चांगल्या वाईट सवयी असतात. मोबाईलशी संबंधित अनेक वाईट सवयी असतात. यापैकीच एक म्हणजे झोपताना फोन उशीखाली ठेवणं, अनेकजण असं करतात. तसेच अनेक जण झोप येईपर्यंत फोन हाताळतात आणि झोपताना फोन डोक्याजवळच कुठेही ठेवतात. परंतु असं करणं किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला याची माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबतची माहिती देत आहोत. फोन उशीखाली ठेवून झोपल्याने काय समस्या येतात, याची माहिती तुम्हाला या लेखाद्वारे मिळेल. 

ओव्हरहीटिंगमुळे आग लागू शकते
फोन गरम झाल्याने स्फोट झाल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा पाहिल्या असतील, वाचल्या असतील. ही बाब खूपच धोकादायक आहे. सकाळी फोनची बॅटरी फुल असावी म्हणून अनेक जण रात्री फोन चार्जिंगला लावून झोपतात. असं करणं देखील धोकादायक ठरू शकतं. कारण अनेक जण फोन उशीखाली ठेवून चार्जिंगला लावतात. फोन उशिखाली ठेवल्याने फोन जास्त गरम होण्याचा धोका असतो. तसेच त्यावर बाहेरून दाब देखील तयार होतो. जेव्हा आपण फोन चार्जिंगला लावतो तेव्हा फोन आणि चार्जर गरम होतात. ज्यामुळे आग लागू शकते किंवा अचानक स्फोट देखील होऊ शकतो. जर तुम्ही फोन चार्ज करण्यासाठी फोनच्या मूळ चार्जरपेक्षा वेगळा चार्ज वापरत असाल तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या फोनसाठी अधिक धोकादायक ठरू शकतं.Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top