गौतम अदाणी जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या स्थानी, पुढे फक्त इलॉन मस्क...

0
अदानींच्या उद्योग साम्राज्याचा विस्तार –
६० वर्षीय अदानी यांनी मागील काही वर्षांपासून पोर्ट-टू-पॉवर ट्रान्समिशन साम्राज्याचा विस्तार केला आहे. तसेच, डेटा सेंटर्सपासून ते सिमेंट, मीडिया आणि अनेक अशा विविध व्यवसायांमध्ये प्रवेश देखील केला आहे. अदानी समूहाकडे आता देशातील सर्वात मोठे विमानतळ ऑपरेटर, पॉवर जनरेटर आणि बिगर-राज्य क्षेत्रातील सिटी गॅस वितरक आणि कोळसा खाण कामगार आहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी जगातील अतिश्रीमंतांच्या यादीत LVMH Moet Hennessy – Louis Vuitton चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष बर्नार्ड अरनॉल्ट यांना मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार गौतम अदानी हे आता जगतील दुसऱ्या क्रमांकाचे अतिश्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीत त्यांच्या अगोदर आता केवळ इलॉन मस्क हेच आहेत.

फोर्ब्सच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार, अदानी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ही शुक्रवारच्या सुरुवातीस अरनॉल्ट यांच्या १५५.२ बिलियन डॉलर्सच्या तुलनेत १५५.४ अब्ज डॉलर्स एवढी होती. फोर्ब्सच्या यादीत सध्या स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) इलॉन मस्क हे अग्रस्थानी आहेत. ज्यांची एकूण संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर्स आहे. त्याच्यापाठोपाठ अदानी, अरनॉल्ट आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (१४९.७ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक लागतो. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी ९२.३ अब्ज डॉलर्स संपत्तीसह आठव्या स्थानावर आहेत. त्यांच्या अगोदर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (१०५.३ अब्ज डॉलर्स ), लॅरी एलिसन (९८.३ अब्ज डॉलर्स) आणि वॉल स्ट्रीटचे वॉरेन बफे (९६.५ अब्ज डॉलर्स) यांचा क्रमांक येतो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top