सांगलीत सायबर गुन्हे रोखण्याच्या उपाय योजनेसाठी मराठा छावणी व क्विक हिल फाउंडेशनच्या संयुक्त माध्यमातून एक बैठक संपन्न

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)

आज दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी मराठा छावणी व क्वीक हिल फाउंडेशनच्या संयुक्त माध्यमााने, सायबर गुन्हे रोखण्यासाठी व त्यावरील उपाय योजनांसाठी, एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती .सध्या सायबर जगात घडत असलेली सायबर गुन्हेगारी ही प्रचंड प्रमाणात वाढत असून, निरपराध लोक याला मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत .सायबर क्राईमचे गुन्हेगार, खात्यामधूनच नुसते पैसेच काढत नाहीत तर नव्या नव्या ब्लॅकमेल करण्याच्या पद्धती अवलंबत आहे. ज्यामध्ये बळी पडलेल्या व्यक्ती शिवाय त्यांचे कुटुंब इष्टमित्र यांना सुद्धा टार्गेट केले जात आहे .कोरोना नंतर तर या सायबर क्राईमच्या गुन्हेगारांचा प्रचंड प्रमाणात उद्रेक झाला आहे. कारण प्रत्येक जण ऑनलाइन व्यवहाराच्या जगात वावरत आहे. फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर ,इंस्टाग्राम, ऑनलाइन पेमेंट यासारख्या माध्यम प्रणालीचा वापर, संपूर्णपणे या सायबर क्राईमच्या गुन्हे वाढीस उद्युक्त करत आहेत, हीच खरी डोकेदुखी झाली आहे. सायबर माध्यमाचे जग, आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनत चालले आहे .सदरहू वाढलेल्या सायबर फसवणुकीस व गुन्हेगारीस कसा आळा घालावा हे आताजनसामान्यलोकांना माहित नाही. मराठा छावणी व क्विक हिल यासारख्या जागरूक समाजसेवी संस्थांनी, सायबर सुरक्षा जागरूक ते विषयी माहिती, लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एक उत्तम मार्गदर्शिका तयार केली असून, ती संपूर्ण तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या मार्गदर्शिकेच्या माहितींमध्ये विविध सायबर घोटाळे कसे घडतात. घडलेच तर स्वतःला सुरक्षित कसे करायचे ?तक्रार कुठे व कशी नोंदवावी ? हे अतिशय सोप्या व सुलभ भाषेत नमूद केले आहे अशी माहिती फाउंडेशनच्या विभागीय समन्वयक सौ गायत्री पवार -केतकर यांनी दिली आहे .आपल्या सर्व स्मार्टफोन असलेल्या कुटुंबीयांच्या घरी, ही मार्गदर्शक सूची असणे अत्यंत आवश्यक आहे. आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांची, सायबर क्राईम विभागाचे अधिकाऱ्यांच्या सोबत लवकरच बैठक व चर्चा होऊन ,पुढील प्रबोधनाचे काम आमच्या संस्थेमार्फत होणार आहे. वेळप्रसंगी सर्वसामाजिक संस्थांची मदत घेणार आहोत व सामाजिक सायबर सुरक्षा मजबूत व्हावी यासाठी युद्ध पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आहोत .यासाठी सक्षम पातळीवरील कक्ष तयार करण्याचे काम सुरू असून सायबर पिडींताना मदतीचा व मार्गदर्शनाचा हात दिला जाईल. आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित या ब्रीदवाक्यावर, आमच्या संस्थेने भर दिला आहे. सदरहू बैठकीस श्रीकांत शिंदे, संगीता मोरे, सर्जेराव पाटील ,संजय कोरे ,सचिन सगरे, विवेक पवार, अॅड. अवधूत देशपांडे, सुयोग हावळ, ओंकार पाटणे, अॅड. विकास गोसावी ,अॅड.योगेश नाडकर्णी आदि उपस्थित होते.

This news is co-provided by Janpratisadnews
Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top