श्रीलंकेचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते श्रीलंकेने फक्त या सामन्यात करून दाखवलं...

0
श्रीलंकेचा सघ या सामन्यासाठी फेव्हरेट समजला जात नव्हता. कारण पाकिस्तानच्या संघाचे पारडे जड समजले जात होते. कारण या संपूर्ण वर्षभरात श्रीलंकेच्या संघाला धावांचा पाठलाग करताना एकही सामना जिंकता आला नव्हता. या वर्षात श्रीलंकेचा संघ तब्बल सात वेळा प्रथम फलंदाजी करून धावांचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण सातपैकी एकदाही त्यांना यश मिळालं नव्हतं. त्याचबरोबर आजच्या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने टॉस गमावला होता. या स्पर्धेत ज्या संघाने टॉस गमावला त्यांना विजय मिळवता आला नव्हता. कारण प्रत्येक संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली होती आणि त्यांना सामना जिंकण्यात यश मिळालं होतं. त्यामुळे आजचा सामना श्रीलंका जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटत नव्हते. पण श्रीलंकेच्या संघाने यावेळी कमाल केली. पाच विकेट्स गेल्यावरही भानुका मैदानात उभा राहीला आणि त्याने अर्धशतक झळकावले. त्याचबरोबर श्रीलंकेच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक कामगिरी केली. श्रीलंकेच्या वानिंडू हसरंगाने यावेळी एकाच षटकात तीन बळी मिळवले आणि सामना श्रीलंकेच्या बाजूने फिरला. श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते फक्त या एका सामन्यात करून दाखवलं आहे. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. कारण या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा संघ हा सामना हरणार, असे म्हटले जात होते आणि त्याच्यामध्ये तशी पार्श्वभूमीही होती. श्रीलंकेमध्ये राजकीय अस्थिरता आहे. त्यामुळे या स्पर्धेचे यजमानपद मिळूनही त्यांना ती भरवता आली. या गोष्टीचे शल्य श्रीलंकेला होते. पण आता ही स्पर्धा युएईमध्ये झाली असली तरी ते चॅम्पियन ठरले आहेत. पण देशात राजकीय अस्थिरता असूनही श्रीलंकेच्या संघाने हा चषक फक्त एकाच शब्दाच्या जोरावर जिंकल्याचे आता समोर आले आहे. कारण सामना संपल्यावर सामनावीर ठरलेल्या भानुका राजपक्षाने आपल्या या विजयाचे रहस्य सांगितले.

भानुका हा श्रीलंकेसाठी तारणहार ठरला. कारण श्रीलंकेने फायनलमध्ये पाच विकेट्स गमावले होते. पण त्यानंतर भानुकाने झुंजार अर्धशतक झळकावले. भानुकाने ४५ चेंडूंत नाबाद ७१ धावांची तुफानी खेळी साकारली. सामना संपला आणि सामनावीर पुरस्काराची घोषणा झाली. हा पुरस्कार भानुकाला देण्यात आला. त्यावेळी समालोचक रवी शास्त्री यांनी भानुकाला एक प्रश्न विचारला आणि त्यानंतर भानुकाने आपल्या या यशाचे रहस्य सांंगितले. पाच विकेट्स गेल्यावर तुझ्या मनात नेमकं काय चालू होतं, असा प्रश्न शास्त्री यांनी भानुकाला विचारला. त्यावर भानुका म्हणाला की, " परिस्थिती ही सोपी नव्हती. पण श्रीलंकेच्या संघाची एक खास गोष्ट आहे आणि ती म्हणजे सकारात्मकता. संघातील ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे, कारण त्यामुळे आपण कोणत्याही गोष्टीवर मात करू शकतो आणि हीच गोष्ट या सामन्यातही पाहायला मिळाली. आम्ही सकारात्मक होतो. त्यामुळे आम्ही जास्त दडपण घेतले नाही. या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला. कारण मी आणि वानिंडू जेव्हा फलंदाजी करत होतो, तेव्हा आक्रमण कोणी करायचो, याचा विचार सुरु होता. वानिंडूला तेव्हा आक्रमण करायचे होते. पण नशिब असं होतं की, आम्ही दोघेही पाकिस्तानच्या गोलंदाजीवर तुटून पडलो आणि त्यामध्ये यशस्वीही ठरलो."

श्रीलंकेमध्ये राजकीय अस्थिरता आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे देशातील अवस्था बिकट आहे. परिस्थिती सोपी नाही. पण तरीही श्रीलंकेच्या संघाने हार मानली नाही. कारण भानुकाने सांगितलेला एकच शब्द श्रीलंकेतील नागरिकांसाठी आणि संघासाठीही महत्वाचा ठरत आहे आणि तो म्हणेज सकारात्मकता. ही एकच गोष्ट श्रीलंकेतील नागरिक आणि खेळाडू यांनी डोळ्यापुढे ठेवली आहे आणि त्यामुळेच ते तग धरून आहेत. कारण यजमान असूनही त्यांना ही स्पर्धा भरवता आली नाही. त्यामुळे श्रीलंकेच्या सरकारचे नुकसान झाले. पण तरीही त्यांच्यासाठी ही स्पर्धा खास ठरली ती सकारात्मकता.

This news is co-provided by Janpratisadnews


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top