सांगली जिल्हा व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात आंदोलन

0 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(*अनिल जोशी*)* 


महाराष्ट्रात राष्ट्रवादी युवक काँग्रेस कडून ,प्रचंड वाढलेल्या महागाई विरोधात आंदोलन करण्यात येत असून ,त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढलेल्या महागाई विरोधात प्रखर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल दादा पवार याने केले .केंद्रातील भाजप सरकारच्या काळात प्रचंड वाढलेल्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी, तसेच 50 खोके महागाई एकदम ओके अशा घोषणा देऊन परिसर दणाणून देऊन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना युवक राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार म्हणाले की जीवनावश्यक वस्तू ,खाण्याचे पदार्थ ,पेट्रोल ,डिझेल, गॅस यासह अनेक वस्तूंच्या झालेल्या भरमसाठ दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे ,कष्टकरी माता-भगिनींचे दैनंदिन जीवन असह्य बनले आहे. देशातील जनतेला अच्छे दिन ची स्वप्ने दाखवून सत्तेवर बसलेल्या भाजपच्या केंद्र सरकारने देशातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास केला आहे .देशातील युवकांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे अशा सर्व गोष्टींकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी सदरहू आंदोलन करण्यात येत आहे .सदरहू आंदोलन स्थळी असिफ बावा ,हरिदास पाटील, धनंजय पाटील ,वंदना चंदनशिवे, महंमद मनेर, समीर कुपवाडे, महालिंग हेगडे ,संदीप वनमाने ,सुनील भोसले ,अक्षय अलकुंटे, साकी पठाण, उत्तम कांबळे डॉ. शुभम जाधव, गॅब्रियल तिवडे, अर्जुन कांबळे ,वाजिद खतीब ,सुरेखा सातपुते ,रूपाली कारंडे, छाया पांढरे, सुनीता जगधने ,संगीता जाधव ,उमर गवंडी ,डॉ.सतीश नाईक, संदीप दळवी ,मुन्ना शेख, आदित्य नाईक, धर्मेंद्र कोळी ,पप्पू कोळेकर, अजित दुधाळ, अरुण चव्हाण ,सुशांत काळे ,युसुफ जमादार, अकबर शेख ,कुमार वायदंडे ,सुमुक पाटील ,सोमनाथ सूर्यवंशी, पिंटू माने, सनी गाडे, अक्षय शेंडगे ,अमिन शेख ,सरफराज शेख ,अमित पाटील, प्रशांत खांडेकर, अफजल मुजावर ,नितीन माने, विक्रम शिंदे ,सचिन कांबळे, आदर्श कांबळे ,सचिन सगरे ,राहुल यमगर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे व सांगली मिरज कुपवाड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top