पुन्हा होणार भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच...

0

 

बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये स्थान मिळवले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजीकरत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या.

स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आता यात पाकिस्तानचा देखील समावेश झाला आहे. पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिकेट चाहत्यांना एका आठवड्यात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान ही हायव्होल्टेज मॅच पाहता येणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रेडियमवर गेल्या रविवारी या दोन्ही संघात लढत झाली होती. आता या रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी पुन्हा त्याच मैदानावर दोन्ही संघ लढतील.


०३ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, शारजाह
०४ सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
०६ सप्टेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई
०७ सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
०८ सप्टेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
०९ सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, दुबई

११ सप्टेंबर- अंतिम लढत, दुबई


This news is co-provided by JanpratisadnewsPost a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top