महाराष्ट्र राज्याला, पुढच्या दोन वर्षात ,गुजरातच्या पुढे नेऊन दाखवतो की नाही बघाच --महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0 *जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क* 

 *(अनिल जोशी)* 


 गेले काही दिवस फॉक्स कॉन- वेदांता प्रकल्पाच्या प्रकरणावरून, महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यापूर्वीचा राज्यात प्रस्तावित असलेला रिफायनरीचा प्रकल्प आणि वाढवन बंदराचा प्रकल्प आकाराला असता तर एव्हाना महाराष्ट्र औद्योगिक विकासात इतर राज्यांच्या तुलनेत, १० वर्ष पुढे जाऊन ,वरिष्ठ श्रेणीत पोहोचला असता. त्यामुळे आमच्या सरकारकडून हे दोन्हीही प्रकल्प महाराष्ट्रात आणले जाणार आहेत. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र जरी गुंतवणूकदारांना व उद्योजकांना आकर्षित करण्यास गुजरातपेक्षा कमी पडला तरी येत्या २ वर्षात महाराष्ट्र राज्याला गुजरातच्या पुढे कोणत्याही परिस्थितीत नेऊन दाखवतो की नाही ते बघावे असे विधान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. शुक्रवारी ते एका कार्यक्रमात बोलताना सदरहू वक्तव्य त्यांनी केले. गेले काही दिवस वेदांता -फॉक्स कॉन प्रकरणावरून महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर टीकेची जी झोड उठली आहे त्याच्या अनुषंगाने हे वक्तव्य त्यांनी केले आहे. देशाच्या इतिहासात, महाराष्ट्रात नाणार प्रकल्पाच्या द्वारे सर्वात मोठी म्हणजे साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक होणार होती. सदरहू गुंतवणूक झाली असती तर किमान आपण पाच लाख लोकांना रोजगार देऊ शकलो असतो .नाणार रिफायनरी प्रकल्प, महाराष्ट्रात उभारला असता तर महाराष्ट्र गुजरातपेक्षा तीन ते चार पटीने प्रकल्पाच्या दृष्टीने मोठा झाला असता, परिणामी महाराष्ट्र राज्याची प्रगती दहा वर्षे पुढे गेली असती. सध्या परिस्थितीत आपण हा तेल शुद्धीकरण नाणार रिफायनरी प्रकल्प देखील उभा करणार आहोत पण मात्र तीन ते चार वर्षाच्या विलंबामुळे सदरहू प्रकल्पातील आर्थिक गुंतवणूक पूर्वी इतकी होणार नाही शिवाय गुंतवणूकदारही राज्यातील वातावरण कसे आहे ते बघून ठरवत असतात. पायाभूत सेवांच्या क्षेत्रांपासून सर्वाधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होत असते पण महाराष्ट्र राज्यात बुलेट ट्रेन, मेट्रो सारखे प्रकल्प बंद झाले ह्या सर्व गोष्टींचा गुंतवणूकदार व उद्योजक विचार करत असतात असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top