मनपा अधिकाऱ्यांवरील दबाव तंत्रास प्रतिबंध करा

0

 मनपा अधिकाऱ्यांवरील दबाव तंत्रास प्रतिबंध करा


- शाहू युथ फाऊंडेशनची निवेदनाद्वारे कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांकडे मागणी 


- मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराकोल्हापूर : (जनप्रतिसाद न्यूज विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)


कोल्हापूर महानगरपालिकेतील घरफाळा घोटाळा प्रकरणी प्रशासकाने वस्तुस्थिती जनतेस समोर जाहीर करावी. तसेच तथाकथित अहवालाची सत्यता तपासून त्याद्वारे महानगरपालिका अधिकारी यांच्यावर होत असलेल्या दबाव तंत्रास प्रतिबंध करण्यात यावा, या प्रमुख मागणीचे निवेदन शाहू युथ फाऊंडेशनतर्फे मनपा प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या आंदोलनाद्वारे देण्यात आला आहे.


या निवेदनात म्हटले आहे, तथाकथित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घरफाळा घोटाळ्याच्या चौकशी अहवाल कोणत्याही दबावखाली तयार होऊ नये, दोषींनी ज्या अधिकार मर्यादांचा भंग केला आहे. चुकीची कागदपत्र तयार केली आहेत. संगणकावरील नोंदीत फेरफार केले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने दोषी अधिकाऱ्यांच्या नावासह आपला अहवाल लवकरात-लवकर कोल्हापुरातील जनतेसाठी जाहीर करावा, अन्यथा आम्हास सुद्धा या प्रकरणी तीव्र आंदोलन उभारावे लागेल., असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे


यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, युथ फाऊंडेशनचे इंद्रजीत माने, सर्वपक्षीय कृती समितीचे आर के पवार, कोल्हापूर कृती समितीचे बाबा पार्टे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, अवधूत पाटील,

सकल मराठा मोर्चाचे सचिन तोडकर, कॉमन मॅन संघटनाचे  बाबा इंदुलकर,  संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, माजी महापौर नंदकुमार वळंजु, जिजाऊ ब्रिगेडच्या चारुशीला पाटील, वीरशैव लिंगायत समाजचे सुहास भेंडे, गवळी समाजचे प्रसन्न वाझे, कोमनपा पेन्शनर संघटनाचे चंद्रकांत सरनाईक, माजी सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, वैश्य वाणी समाजाचे सुरेशराव कोरगावकर, साळोखे फाऊंडेशनचे अमर साळोखे, ऋणमुक्तेश्वर तालीमचे अरविंद दुर्गुळे,  वंचित बहुजन आघाडीचे 

शहर अध्यक्ष प्रवीण बनसोडे आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top