लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांचा फुटपाथवर मुक्काम...

0

गेली दोन वर्ष करोनामुळे जगाला वेढीस धरलं. त्यातून मुंबईही सुटलेली नाही. कधीही न थांबणाऱ्या मुंबईला देखील करोनात ब्रेक लागला. याकाळात सण-उत्सवांवर पूर्णपणे बंदी घातली गेली. यामध्ये मुंबईकरांनी जर कुठल्या सणाची सर्वात जास्त प्रतीक्षा पाहिली असेल तर तो म्हणजे गणेशोत्सव. यंदा कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी असल्याने मुंबईत पुन्हा एकदा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.

त्यातच लालबागचा राजाची तर भाविक विशेष प्रतीक्षा करत असतात. यंदा दोन वर्षांनी बाप्पाचं दर्शन होणार या आशेने भाविकांनी दोन दिवसांपूर्वीपासूनच लालबागच्या राजाच्या मंडपाबाहेर रांगा लावल्या आहेत. बाप्पाच्या दर्शनाची ओढ अशी की गेल्या दोन दिवसांपासून हे भाविक फुटपाथवर मुक्काम ठोकून बसले आहेत. गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळीही भाविकांची अलोट गर्दी राजाच्या दरबारात पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याचं दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी भाविक गेल्या दोन दिवसांपासून रांग लावून आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

This news is co-provided by Janpratisadnews




Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top