गणेशोत्सवात हुबेहूब दिसणाऱ्या डुप्लिकेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश मंडळाकडून आरती साठी मोठी डिमांड संपूर्ण तारखा बुक

0

पुणे: राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री    झाल्यानंतर पुण्यात राहणाऱ्या त्यांच्याच सारख्या हुबेहूब दिसणाऱ्या  (डुप्लिकेट एकनाथ शिंदे)   यांना सध्या गणेशोत्सवात मोठी डिमांड असून फक्त पुणे शहर नव्हे, तर राज्यातील अनेक गणेश मंडळांकडून विजयराजे माने   बोलावलं जातं आहे. आतापर्यंत आपण अनेक जणांची डुप्लिकेट पाहिले असतील. पण पुण्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट आहेत.   विजयराजे माने असे त्यांचे नाव आहे. विजयराजे माने हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखेच दिसतात.( डुप्लिकेट मुख्यमंत्री )माने यांनी चेहऱ्यावर वाढवलेली दाढी, कपाळावरचा टिळा, आणि ते परिधान करत असलेले व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट, आणि ते वापरत असलेला एकनाथ शिंदे यांच्यासारखाच चष्मा सगळ्यांमुळे माने हे मुख्यमंत्री एकनाथ   शिंदे यांचे डुप्लिकेट कॉपी दिसतात, रोज 7 ते 8 आरत्याचा मान सध्या गणेशोत्सव मोठ्या उत्साहात होत असून गणेशोत्सवात तर मुख्यमंत्र्यांच्या या डुप्लिकेट असणाऱ्या विजय मानेंना पुण्यातील अनेक मंडळ आरतीसाठी बोलवत आहेत. माने रोज शहरभर फिरून 7 ते 8 मंडळाच्या आरत्या पार पाडत आहेत. एवढेच नाही तर माने यांना अनेक उद्घाटनाला देखील बोलावलं जात आहे. फक्त पुणे नव्हे, तर राज्यातील अनेक मंडळांकडून माने यांना बोलावलं जात आहे. यापुढे जाऊन अनेक गणेश मंडळांनी त्यांना विसर्जन मिरवणुकीचे आमंत्रण देखील दिल आहे. तुम्ही येऊन फक्त आमच्या मिरवणुकीच्या मंचावर बसा इतकीच मागणी, या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी माने यांच्याकडे केली आहे.

विजय माने हे हुबेहूब मुख्यमंत्र्यांसारखे दिसतात आणि त्यांनी अनेक कामे देखील केली आहेत. म्हणून आम्ही त्यांना आरतीला बोलावतो. आणि एकदम माने आमच्या आरतीला आले की आमच्या मंडळाच्या बाहेर गर्दीच दिसते, अशी भावना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सांगितली आहे. तुम्ही हुबेहूब आपल्या मुख्यमंत्र्यांसारखे दिसतात. आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलू शकत नाहीत, पण तुमच्या रूपात आम्ही आमच्या गणरायाची आरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाली अशी समजतो, अशा भावना विजय माने यांना गणेश मंडळाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top