राधानगरी चे ते 2 पोलीस ".. "६० लाखांच्या" फेऱ्यात...!

0



- वृत्त सोशल मीडियावर व्हायरल 

- जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असलेली तक्रार दाखल 


कोल्हापूर विशेष प्रतिनिधी :-

 काही महिन्यांपूर्वी राधानगरी परिसरात एक बचतगट आणि फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली. या आर्थिक उलाढाल मध्ये स्थानिक आणि काही दुसऱ्या तालुक्यातील    व्यक्ती सामील होत्या, कोट्यवधी रुपयांची उलाढाल असल्याने यात गुंडांचा सहभाग ओघाने आलेच. यातूनच काही महिन्यांपूर्वी तक्रारी   झाल्या. मात्र, या सगळ्यात राधानगरी पोलिसांनी तब्बल ६० लाख रुपये काढून घेतले आणि कोट्यवधी रुपयांची मागणी केली,  असा राधानगरी पोलिसांच्या विरोधात खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे अतिशय गंभीर स्वरूपाचे आरोप असलेली तक्रार दाखल करण्यात आली आहे.

घटनेविषयी नागरिकांच्यातील चर्चा अशी की , काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर पोलीस दलातील खुद्द स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या दोघं पोलिसांनी लाखो रुपये लाच म्हणून घेताना मुख्यालयांच्या दारात पकडले गेले. आता देखील काही दिवसांपूर्वी याच शाखेच्या पोलिसांनी राधानगरी मध्ये जुगाराची कारवाई करताना  काही पैसे घेतल्याचा आरोप होत आहे. आणि आता हा गंभीर तक्रार अर्ज त्या मुळे पोलिस प्रमुख कोणती कारवाई करणार या कडे सर्वचे लक्ष लागून राहिले आहे. पोलीस प्रमूख या नात्याने जर आत्ताच दाखल घेतली नाही तर पोलिसाची प्रतिमा आणखीन मालिन झाल्या शिवाय राहणार नाही. 

या प्रकरणात येत्या काही दिवसात खूप धक्कादायक माहिती समोर येणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू असून, या प्रकरणात वरीष्ठ पातळीवर देखील काही महत्त्वाच्या अधिकारी आणि यंत्रणा गुप्त पणे लक्ष ठेऊन असल्याची माहिती आहे.

This news is co-provided by Janpratisadnews


Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top